आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला बाहेर जाऊ दिले म्हणून पतीकडून पत्नीस विटेने मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मुलीला बाहेर का जाऊ दिले म्हणून पतीकडून पत्नीस लाथा, बुक्क्यांसह विटेने डोक्यात मारून जखमी केले. तसेच सासू-सासऱ्यांना ही शिवीगाळ केल्याची घटना परतूर तालुक्यातील मसला येथे मंगळवारी घडली.

 
या प्रकरणी जयश्री व्यंकटेश गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आई-वडिलांसह घरी असताना व्यंकटेश दौलतराव गाढवे यांच्यासह इतर तीन जण घरी आले. त्यांनी मुलीला बाहेर का जाऊ दिले म्हणून लाथा बुक्क्यांसह विटांनी  मारहाण केली. यानंतर सासू-सासऱ्यांनाही शिवीगाळ करुन तू येथे कशी राहते, आम्ही पाहून घेतो अशी धमकी दिली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दुसाने हे करत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...