आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दंड भरला नाही म्हणून सातबारा उताऱ्यावर चढवला 76 लाख 20 हजार रुपयांचा बोजा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- तालुक्यातील वाकोद येथील खासगी जमिनीतून ३०० ब्रास वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करून रात्री-अपरात्री वाहतूक करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर तहसील प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून वाळूची अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्याला जमीन मालकास तब्बल ७६ लाख २० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आली होती. 

 

परंतु जमीन मालकाने तहसीलच्या नोटीसला केराची टोपली दाखवली. त्यामुळे तहसील प्रशासनाने थेट शेतकऱ्याच्या जमिनीवरच दंड भरला नाही म्हणून त्याच्या सातबारा उताऱ्यावरच तब्बल ७६ लाख २० हजार रुपयांचा बोजा चढवला आहे. या कारवाईने फुलंब्री तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांची वाळू माफियामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
 
फुलंब्री तालुक्यातील वाकोद येथील गट क्रमांक ३२७ मध्ये मंदाबाई विष्णू लहाने यांची शेतजमीन आहे. परंतु दि. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी या गटामधून विना परवानगी रात्री-अपरात्री या खासगी जमिनीतून ३०० ब्रास वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना मिळाल्यावर त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह या खासगी जमिनीची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांना तेथून अंदाजे ३०० ब्रास वाळूची अवैधरीत्या वाहतूक केल्याचे त्यांना त्यात दिसून आले. त्यामुळे विनापरवानगी गौणखनिजाचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने सदर गौणखनिजाची वाहतूक करण्यात आली आहे. 


जमीन मालक मंदाबाई विष्णू लहाने यांना ७६ लाख २० हजार रुपये दंड नोटीसद्वारे ठोठवण्यात आला होता. यानंतर तहसील प्रशासनाच्या वतीने मंदाबाई लहाने याना वेळोवेळी दंड भर असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी दंड भरलेच नाही शेवटी तहसील प्रशासनाने आदेश काढून दि.२६ डिसेंबर २०१८ रोजी मंदाबाई लहाने यांच्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरच तब्बल ७६ लाख २० हजार रुपयांचा बोजा चढवला आहे. या कारवाईने फुलंब्री तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांची वाळूमाफियामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. दंड भरला नाही म्हणून तहसीलने शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ७६ लाख २० हजार रुपयांचा बोजा चढवला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...