आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंच्या कारकीर्दीप्रमाणे मुक्ताईनगरचे प्रश्नही बनले खडतर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : मुक्ताईनगर. १९९० पासून सलग सहा वेळा निवडून येणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला. विराेधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यात ३० वर्षे गेल्यानंतर जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ अाली तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी 'वनवास' अाला. मंत्रिपदावरून पायउतार झालेल्या खडसेंकडे सरकारने जसे दुर्लक्ष केले तशाच त्यांच्या मतदारसंघातील समस्याही प्रलंबितच राहिल्या.

रखडलेले सिंचन प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या अाणि राेजगार हे या मतदारसंघातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न. १९९५ च्या युतीच्या सत्ता काळातही हे प्रश्न हाेते, अाताच्या भाजप सरकारमध्येही ते कायम राहिले. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हाेते. मात्र, महसूल मंत्रिपदावर त्यांची बाेळवण झाली. वर्षभराच्या अातच भ्रष्टाचाराच्या अाराेपांमुळे त्यांना मंत्रिपद साेडावे लागले. नंतर 'क्लीन चिट' मिळाली, पण पुन्हा मंत्रिपदपासून ते वंचितच राहिले. ही खदखद मनात ठेवून खडसेंनी अनेकदा जाहीरपणे अापल्याच सरकारला बाेल लावले. त्याचा परिपाक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सातव्यांदा त्यांना तिकीट मिळेल का, याविषयीच शंका अाहे.

स्थानिक राजकीय परिस्थिती : खडसे यांचा लढा स्वकीयांशीच
खडसेंना शह देण्यासाठी स्वकीयच टपलेले अाहेत. जिल्ह्यात भाजपच्या फलकावर अाता मुख्यमंत्र्यांच्या बराेबरीने गिरीश महाजन यांची छबी दिसते. तिथे खडसेंना स्थान राहिलेले नाही. गेल्या निवडणुकीत 'कांटे की टक्कर' देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटीलही खडसेंवर खार खाऊन अाहेत. खडसे अापला बालेकिल्ला राखून अाहेत, मात्र विराेधकांपेक्षा त्यांचा लढा स्वपक्षीयांशीच जास्त अाहे.

काही अर्धवट, काही पूर्ण
मुक्ताईनगर उपसा सिंचन योजना : अर्धवट कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना : अर्धपूर्णत्वास १५ वर्षांपासून मुक्ताईनगरातील भारत निर्माण योजना अपूर्ण बोदवड शहर व तालुक्यातील तीव्र टंचाई दूर करण्यात अपयश बोदवड उपसा सिंचन योजना : अर्धवट

काेटीच्या काेटी उड्डाणे, पण 'विकास' मात्र हरवलेला
मतदारसंघात कोटींचा निधी अाला. परंतु 'विकास' हरवलेल्या स्थितीत. कापसावर प्रक्रिया करण्यासाठी एकमेव सहकारी सूतगिरणी. केळीवर प्रक्रिया करणारा माेठा प्रकल्प नाही, त्यामुळे रस्त्याच्या कडेने भट्ट्या पेटलेल्या. व्यापारी संकुल नाही. मुक्ताईनगरी 'टपऱ्यांचे गाव' झालेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना कालबाह्य ठरलेली. नवीन मंजूर, पण काम रखडलेले आहे.

कुटुंबकेंद्रित राजकारणाने जवळचे कार्यकर्तेच नाराज
२०१४ मध्ये खडसेंनी हरिभाऊ जावळेंचे तिकीट कापून स्नुषा रक्षा यांना उमेदवारी दिली. पत्नी मंदाकिनी यांना महानंद-दूध संघाचे अध्यक्षपद, मुलगी रोहिणी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले. या कुटुंबकेंद्रित राजकारणाने कार्यकर्ते दुरावले. आता मुलगी रोहिणी खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनाचे मुक्ताईनगरातून प्रयत्न होऊ शकतात.

असा अाहे मुक्ताईनगर मतदारसंघ
३ तालुक्यांतील १७४ गावांचा हा मतदारसंघ. सावदा ते रावेरचा पट्टा केळी उत्पादकांचा. उर्वरितांचे प्रमुख पीक कापूस. परंतु प्रक्रिया उद्याेगांचा अभाव असल्याने स्थानिक राेजगार नाही. जागतिक दर्जाच्या केळीचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. परंतु त्याच्या निर्यातीसाठी सक्षम यंत्रणा नाही. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून रेल्वेची सुविधा मिळाली, तीही ताेकडीच.

जनता म्हणते : ना लाेकांचा 'नाथ', ना शेतकऱ्यांची 'रक्षा'
मतदार म्हणतात, 'आम्ही नाथाभाऊंना भरभरून मते दिली, मात्र काय मिळाले? ना लाेकांचा 'नाथ' ना शेतकऱ्यांची 'रक्षा.' साधे पिण्यासाठी स्वच्छ पाणी वेळेत मिळत नाही. या मूलभूत प्रश्नावर खडसे समर्थक म्हणतात, 'नाथाभाऊंवर अन्याय झाला.' त्यांना विराेधक तेवढ्याच ताकदीने उत्तर देतात, 'भाऊंनी ३० वर्षांत कधी नगरवासीयांचा न्याय केला?'

जातीय समीकरणे
आदिवासी 3%
मुस्लिम 8%
कोळी 7%
इतर 11%
धनगर 7%
गुजर 8%
मराठा पाटील 30%
लेवा पाटील 25%
 

बातम्या आणखी आहेत...