आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर श्रॉफची हुबेहूब कॉपी हा आसामचा अभिनेता, स्टाइल - फिजिकपासून ते हेयरकटपर्यंत सर्व आहे टायगरसारखे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 205 कोटी रुपयांची कमाई करणारा चित्रपट 'बागी 2' च्या पुढच्या पार्टची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटातील लीड अक्टर टायगर श्रॉफने आपल्या इंस्टाग्रामवर 'बागी 3' चा पोस्टर शेयर केला आहे. त्याने हेही सांगितले की 2020 मध्ये 6 मार्च ला रिलीज होईल. या चित्रपटात टायगर धांसू स्टंट करताना दिसणार आहे. मात्र दुसरीकडे खूप कमी लोकांना म्हाईत आहे की टायगर सारखा हुबेहूब दिसणारा एक आसामचा अक्टर आहे. त्याचे नाव आहे डेविड सहारिया. डेविड केवळ सिर्फ टायगरसारखा दिसत नाही. पण त्याचे फिजिकही टायगरसारखेच आहे. एका एंटरटेन्मेंट पोर्टलशी बोलताना डेविडने सांगितले की, अनेकदा लोक त्याला टायगर श्रॉफ समजतात. पण त्याची इच्छा आहे की लोकांनी त्याला त्याच्या नावाने ओळखावे टायगरच्या नावाने नाही. 

 

मॉडेलिंगने केली सुरुवात.. 
- मॉडेलिंगने करियरची सुरुवात करणारा डेविड सहारिया आता असामी चित्रपटातही काम करत आहे. तो सोशल मीडियावरही अक्टिव असतो. 
- त्याने आपल्या इंस्टाग्रामवर अनेक फोटोज शेयर केलेले आहेत. काही फोटोज तर टायगर श्रॉफच्या स्टाइलमधेही शेयर केले आहेत. 
- डेविडने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते, 'सुरुवातीला हे ऐकणे की माझा लुक टायगरसारखा आहे, हे उत्साहित करायचे. कधी माझ्या लुक्ससाठी माझे कौतुक व्हायचे. ते चांगले वाटते. पण लोक मला टायगरच्या नावाने ओळखतात, माझ्या नाही. अनेकदा हे ऐकून मला खूप वाईट वाटते."
- डेविडने इंटरनेशनल स्पोर्ट्स साइंस एसोसिएशन, कैलिफोर्निया येथून फिटनेसचा कोर्स केला आहे. 
- त्याने 2017 मध्ये स्टारलाइट मिस्टर इंडियाची पदवीही मिळवली आहे. 

 

टाइगर श्रॉफच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, त्याची अपकमिंग फिल्म 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' आहे. डायरेक्टर पुनीत मल्होत्राच्या या चित्रपटात टायगरसोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्क्रीन शेयर करताना दिसत आहे. अनन्या आणि तारा या दोघींचीही ही डेब्यू फिल्म आहे. फिल्म 2019 मध्ये रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...