Home | International | Other Country | ash-cloud-europe

उत्तर-पूर्व युरोपात पोहोचले राखेचे ढग, अनेक उड्डाणे प्रभावित

agencies | Update - May 27, 2011, 12:53 PM IST

आयर्लंडच्या ज्वालामुखीतून तयार झालेले राखेचे ढग आता उत्तर-पूर्व युरोपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे युरोपमधील हवाई वाहतूक पूर्णपणे बिघडण्याची शक्यता सांगितली जाते.

  • ash-cloud-europe

    आयर्लंडच्या ज्वालामुखीतून तयार झालेले राखेचे ढग आता उत्तर-पूर्व युरोपमध्ये दाखल झाले आहेत. या ढगांची दाटीवाटी एवढी झाली आहे की, बर्लिन विमानतळावरील उड्डाणे गुरुवारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेमेन व हॅम्बुर्ग या विमानतळाला याचा फटका बसला आहे. यामुळे युरोपमधील हवाई वाहतूक पूर्णपणे बिघडण्याची शक्यता सांगितली जाते.
    याअगोदर मंगळवारी वारे आयलंडच्या ग्रीमस्वॉन ज्वालामुखीकडून स्कॉटलंडच्या दिशेने वाहत होते. त्यामुळे ५ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, बुधवारी परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मते आता राखेचे दाट ढग हळूहळू विरळ होऊ लागले आहेत.
    दरम्यान, जर्मनीच्या टॅगल, स्कॉनफेल्ड या विमानतळांवरून उडणाऱ्या सर्व विमानांना थांबविण्यात आले आहे. ब्रॅमन, हॅम्बुर्ग व ल्युबक येथील विमानांना उड्डाणासाठी तासानतास अडथळे येत होते.Trending