Home | News | Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

आशा भोसलेंनी कायमचे गमावले आहे त्यांच्या मुला-मुलीला, या 7 कलाकारांनीही भोगले आहे बाळ गमावल्याचे दुःख

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 12:13 AM IST

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा हेमंत भोसले आणि मुलगी वर्षा भोसले हे दोघेही आता या जगात नाहीत.

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children


  मातृत्वाची चाहुल लागणे ही प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय आनंदाची पर्वणी असते. प्रेग्नेंसीच्या काळात एखादी स्त्री केवळ आनंदीच नसते, तर तिच्या चेह-यावर एक वेगळीच चमक दिसू लागते. याकाळात स्त्रीला स्वतःसोबतच आपल्या गर्भात वाढणा-या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र कधीकधी सगळी खबरदारी घेऊनदेखील अनेक स्त्रियांना गर्भापाताला सामोरे जावे लागले. बॉलिवूडमध्येसुद्धा अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना मातृत्वाची चाहुल लागली खरी मात्र गर्भपातामुळे त्यांचे हे स्वप्न काही क्षणात भंगले. इतकेच नाही तर काही सेलिब्रिटींची मुले जन्माला आल्यानंतर या जगातून कायमची निघून गेली. काहींचा अपघाती तर काहींचे आजारपणात निधन झाले. आशा भोसले यांच्या मुलीने तर स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली.

  आशा ताईंच्या मुला-मुलीचे झाले निधन...
  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा हेमंत भोसले आणि मुलगी वर्षा भोसले हे दोघेही आता या जगात नाहीत. काही वर्षांपूर्वी आशाताईंची कन्या वर्षा भोसले यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. तर त्यांचा पुत्र आणि संगीत दिग्दर्शक हेमंत भोसले यांचे सप्टेंबर 2015मध्ये कर्करोगाच्या दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. एक संगीत दिग्दर्शक म्हणून हेमंत भोसले यांनी छाप निर्माण केली होती. फिर तेरी याद, सनसनी खेज कोई बात, तेरी मेरी कहानी,आया रंगीला सावन,अब कहाँ जायेंगे हम ही त्यांनी संगीत दिलेली गाणी बरीच गाजली. हेमंत भोसले यांना एक मुलगी असून ती इंग्लडमध्ये शिकत आहे.

  कोणकोणत्या सेलिब्रिटींनी त्यांची मुले गमावल्याचे दुःख सहन केले, त्यांच्याविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  गोविंदा आणि सुनीता कपूर 
  अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी टीनाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पणदेखील केले आहे. टीना (नर्मदा) गोविंदाची मोठी मुलगी असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. मात्र टीनापूर्वी गोविंदाला अजून एक मुलगी होती. मात्र चार महिन्यांची असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला होता. एका मुलाखतीत स्वतः गोविंदाने त्याच्या आयुष्यातील हा इमोशनल क्षण शेअर केला होता. तो म्हणाला होता, "मी माझ्या कुटुंबात 11 मृत्यू पाहिले आहेत. यामध्ये माझ्या मुलीचाही समावेश आहे. माझी थोरली मुलगी चार महिन्यांची असताना मृत्यूमुखी पडली. ती प्रीमॅच्युअर बेबी होती."

   

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  आमिर खान आणि किरण राव

  अभिनेता आमिर खानने किरण रावसोबत दुसरे लग्न थाटले. लग्नानंतर २००९ मध्ये किरण तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. प्रेग्नेंट किरणचे मिसकॅरेज झाले. आमिरने ही दुःखद बातमी ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर २०११ मध्ये आमिरने मुलगा आझाद राव खानच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना सांगितली. आमिरचा मुलगा आझादचा जन्म आयवीएफ सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  काजोल आणि अजय देवगण
  लग्नाच्या काही दिवसांतच अभिनेत्री काजोलला मातृत्वाची चाहुल लागली होती. मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काजोल २००१ साली पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. मात्र प्रेग्नेंसी पीरियडमध्ये त्रास झाल्याने तिचा गर्भपात झाला. त्यानंतर २० एप्रिल २००३ रोजी काजोलने मुलगी न्यासाला जन्म दिला. न्यासाच्या जन्माच्या सात वर्षांनी काजोल दुस-यांदा आई झाली. १३ सप्टेंबर २०१० रोजी तिने मुलगा युगला जन्म दिला.

   

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  अभिनेता प्रकाश राज आणि त्यांची पहिली पत्नी ललिता कुमारी 

  प्रसिद्ध दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनीही त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाला कायमचे गमावले आहे. 1994 मध्ये प्रकाश राज यांनी ललिता कुमारीसोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला मेघना आणि पुजा या दोन मुली तर सिद्धू हा एक मुलगा झाला. पण सिद्धू पाच वर्षांचा असताना त्याचे अपघाती निधन झाले. 2009 मध्ये प्रकाश यांनी ललिता कुमारी यांच्यापासून घटस्फोट घेतला आणि कोरिओग्राफर असलेल्या पोनी वर्मासोबत दुसरे लग्न थाटले. प्रकाश आणि पोनी वर्मा 2016 मध्ये एका मुलाचे आईवडील झाले आहेत. 

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
  बिझनेसमन राज कुंद्रासोबत २००९ मध्ये लग्नागाठीत अडकल्यानंतर काही महिन्यांतच शिल्पा गर्भवती राहिली होती. मात्र तिचा गर्भपात झाला होता. त्यानंतर २१ मे २०१२ रोजी शिल्पाने मुलगा वियानला जन्म दिला. दुस-या प्रेग्नेंसीच्या वेळी शिल्पाला साडे सात महिने इंजेक्शन्स घ्यावे लागले होते. 

   

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  फरदीन खान आणि नताशा खान
  २०१२ मध्ये फरदीनने ट्विटवरुन त्याची पत्नी नताशा प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. नताशाला जुळी मुले होणार होती. मात्र याचकाळात नताशाचे मिसकॅरेज झाले. त्यानंतर २०१३ मध्ये नताशा पुन्हा एकदा आई होणार असल्याचे समजले. डिसेंबर २०१३ मध्ये नताशाने मुलीला जन्म दिला. या दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव डायना ईसाबेल खान असे ठेवले आहे. २०१७ मध्ये फरदीन आणि नताशा एका गोंडस मुलाचे आईबाबा झाले आहेत. 

   

 • Asha Bhosale And these 7 Bollywood Celebs who Faced the Pain of Losing their Children

  दिलीप कुमार आणि सायरा बानो
  बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना एकही अपत्य नसल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र लग्नानंतर सायरा बानो गर्भवती राहिल्या होत्या, याविषयी फारशी कुणाला माहिती नाही. दिलीप साहेबांच्या द सबस्टांस अँड द शॅडो या ऑटोबायोग्राफीत याविषयी खुलासा करण्यात  आला आहे. पुस्तकात दिलीप साहेबांनी सांगितले, "सत्य हे आहे, की सायरा १९७२ साली गर्भवती राहिल्या होत्या. आठव्या महिन्यात सायरा बानो यांना ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागला. मात्र विकसित झालेल्या गर्भाला ऑपरेशन करुन बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे श्वासोच्छवास गुदमरल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता." या घटनेनंतर सायरा पुन्हा प्रेग्नेंट झाल्या नसल्याचे दिलीप साहेबांनी सांगितले होते.

   

Trending