Bollywood / आशा भोसले यांनी विचारले - आता मी 'हरे कृष्णा, हरे राम' हे गाणे गाऊ शकते ?, यूजर्सने दिले मजेदार उत्तर

आशा भोसले म्हणाल्या, 'चेष्टा केली होती' 

दिव्य मराठी

Jul 27,2019 12:47:44 PM IST

बॉलिवूड डेस्क : 23 जुलैला 49 व्यक्ती पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून म्हणाले होते की, ‘जय श्री राम’ हिंसा भडकावणारी एक घोषणा बनली आहे. याच्या नावावर मॉब लिंचिंगच्या घटना घडतात. देशात सुरु असलेल्या या अशा घटनांवर सिंगर आशा भोसले यांनी एक ट्वीट केले, ज्यांनंतर त्यांच्या ट्वीटवर लोकांनी मिळत्या जुळत्या प्रतिक्रिया दिल्या.

आशा भोसले यांनी शुक्रवारी एक ट्वीट करून विचारले, "दम मारो दम, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण, हरे राम", मी हे सदाबहार गाणे आता गाऊ शकते का ?' यावर आलेल्या काही कमेंट्स मजेदार होत्या. काही यूजर्सने आशजींबद्दल निष्पक्ष नसणे आणि मोदी सरकारची बाजू घेणे अशा गोष्टी लिहून ट्रोलदेखील केले.

आशा भोसले म्हणाल्या, 'चेष्टा केली होती'...
एका टीव्ही न्यूज चॅनलने प्रश्न केला तर, आशाजी म्हणाल्या, "मी केवळ चेष्टा केली होती. जे सध्याच्या काळात सुरु आहे, हे त्याबद्दलचे माझे विचार होते. याचा दूसरा काहीही अर्थ नव्हता. मी याबद्दल आणखी काही बोलणार नाही."

X