आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅशेस मालिका 47 वर्षांनंतर बराेबरीत; ट्राॅफी दुसऱ्यांदा राहणार ऑस्ट्रेलियाकडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आेव्हल - यजमान इंग्लंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर प्रतिष्टेच्या  अॅशेस मालिकेतील पराभव टाळला. इंग्लंडने चाैथ्या कसाेटीत ऑस्ट्रेलियावर १३५ धावांनी मात केली. यासह इंग्लंडने पाच कसाेटी सामन्यांची ही मालिका २-२ ने बराेबरीत ठेवली.  यामुळे आता दुसऱ्यांदा अॅशेसची ट्राॅफी ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे. तब्बल ४७ वर्षांनंतर ही मालिका बराेबरीत राहिली आहे. यापूर्वी १९७२ मध्ये मालिका २-२ ने बराेबरीत हाेती.  ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि फाॅर्मात असलेला फलंदाज स्मिथ (२३) अॅशेस मालिकेत मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने पाच सामन्यांच्या या मालिकेत १११  च्या सरासरीने ७ डावांत ७७४ धावा काढल्या. त्याच्या नावे आता एका मालिकेत पहिल्यांदा ७७० पेक्षा अधिक धावांची नाेंद झाली आहे.  त्याने यापूर्वी असा पराक्रम २०१५ मध्ये भारताविरुद्ध मालिकेत केला हाेता. मालिकेत त्याच्या नावे ७६९ धावांची नाेंद झाली हाेती.   यजमान इंग्लंडने पाचव्या कसाेटीतील विजयासाठीचा आपला दावा अधिक मजबूत केला. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३२९ धावा काढल्या. यासह  इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमाेर विजयासाठी ३९९ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले. वृत्त लिहिस्ताेवर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या डावात २६३ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. यासह इंग्लंडने १३५ धावांनी मात केली. 


फक्त एकदाच  गाठले ३९०+ धावांचे लक्
ष्य 
ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार डावांत फक्त एकदाच ३९० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. टीमने १९४८ मध्ये लीड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ४०४  धावांचे लक्ष्य गाठले हाेते. डाॅन ब्रॅडमॅनने १७३ धावांची खेळीच्या बळावर हा पल्ला गाठून दिला हाेता. 

११३ वर्षांचा विक्रम; सलामीवीर अपयशी   
ऑस्ट्रेलियाकडून  हॅरिस हा एकेेरी धावावर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर १४ वेळा एकेरी धावावर बाद झाले. हा ११३ वर्षांच्या इतिहासातील  विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे झाला.  १९०६ मध्ये इंग्लंडचे १३ सलामीवीर हे आफ्रिकेविरुद्ध  मालिकेत बाद  झाले हाेते. 

ब्राॅडकडून सातव्यांदा वाॅर्नरची विकेट
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडने अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन सलामीवीर वाॅर्नरला सातव्यांदा बाद केले.  आतापर्यंत सहा गाेलंदाज एका मालिकेत एकाच फलंदाजाला प्रत्येकी सात वेळा बाद करू शकले आहेत. कसाेटीत ब्राॅडने वाॅर्नरला १२ वेळा बाद केले आहे.