आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाबांना त्रास झाला म्हणून मुलीने का राजीनमा दिला नाही?' पवारांवर आशिष शेलारांचा घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलारांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत शेलारांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांना 'ठग्स ऑफ ठेवीदार' असा उल्लेख केला."एक चित्रपट आलेला ठग्स ऑफ हिंदुस्थान. पण, हे तर "ठग्स ऑफ ठेवीदार" आहेत. हा पवार परिवार ठग्स काका पुतण्याचा आहे. शरद पवार यांचे नाव का आले हे आम्हला विचारले जात आहे, पण कोर्टानेच 4 वेळा त्यांचे नाव घेतले आहे. पवार हे व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत", असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.

मुलीने राजीनामा का दिला नाही?
"या सगळ्या प्रकारामुळे आम्हला पहिल्यांदा कळले की काकांना त्रास झाला म्हणून पुतण्याने राजीनामा दिला. पण बाबांना त्रास झाला म्हणून मुलीने राजीनामा दिला नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. तुम्ही शेतकऱ्यांचे ठग्स आहात. आणि हेच मुद्दे आम्ही निवडणुकीत घेऊन जाणार आहोत", असा घणाघात शेलारांनी केला.

बातम्या आणखी आहेत...