आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या शुभेच्छा पण वाढत्या वयानुसार परिपक्वता वाढवी, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आशिष शेलार यांनी आशिष शेलार यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण वाढत्या वयानुसार परिपक्वता वाढावी असे शेलार म्हणाले. भाजपची आज संघटनात्मक तयारीची महत्वाची बैठक आहे. 90 हजार बूथवर संघटन मजबूत करणे या विषयावर आज देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतील अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर व्यक्त केलेले प्रेम आणि आदर स्वार्थी होता की निस्वार्थी हे महाराष्ट्र जाणून आहे. मंदिराची शपथ घेऊन राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवण्याचे काम सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात दुरावा निर्माण करणारे रोज सकाळी टीव्हीवर येतात. राज्यातील जनतेला रोज सकाळी वग नाट्य पाहायला मिळते आहे. शाह- मोदींना समजण्यासाठी आणखी एक जन्म घ्यावा लागेल असे शेलार यावेळी म्हणाले. याआधी मातोश्रीवरून निघालेले लोक राज ठाकरेंना भेटायला जात नव्हते. मात्र आता थेट माणिकराव ठाकरेंकडे जात असल्याचे आशिष शेलार यावेळी म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...