आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ashiya Wrote Book On Ishninda Case In Pakistan, In Iran Companies Make Protesters A Profit Tool

पाकमध्ये ईशनिंदा प्रकरणातील आसियाने लिहिले पुस्तक, तिकडे इराणच्या कंपनीने निदर्शनांना बनवले नफ्याचे साधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गळ्यात लोखंडी पट्टा, साखळी बांधून ओढायचे, केवळ अश्रू सोबत होते : आसिया
  • इराण विरोधावेळी जाळण्यासाठी केवळ अमेरिका, इस्रायलचे ध्वज बनवतेय कंपनी

​​​​​​आठ वर्षांच्या कैदेनंतर आसियाची सुटका, फ्रेंच पत्रकारासोबत लिहिले पुस्तक

पॅरिस : ईशनिंदेच्या अारोपात ८ वर्षे पाकिस्तानच्या कारागृहात घालवणारी ख्रिश्चन महिला आसिया बीबीने पहिल्यांदाच मौन सोडले. त्यांनी फ्रान्सची पत्रकार एन्ने- इसाबेले टोलेट सोबत एक पुस्तक लिहिले- एनफिन लिबरे, म्हणजे शेवटी स्वातंत्र्य.

आसिया यांना २०१० मध्ये मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. मात्र, २०१८ मध्ये अचानक त्यांची सुटका करण्यात आली. आता त्या कॅनडात अज्ञातस्थळी राहतात. टोलेट एकमेव पत्रकार आहेत ज्यांनी कॅनडात आसियाची भेट घेतली.

कधीच मायदेशी न परतण्याच्या अटीने बांधल्या गेलेल्या आसिया लिहितात- तुम्ही माध्यमांद्वारे माझी कथा जाणून आहात. मात्र, कैद, नव्या आयुष्याबाबत तुम्हाला काहीच माहिती नाही. मी कट्टरतेच्या कैदेत होती. अश्रूच एकमेव आधार होता. मानेवर लोखंडाचा पट्टा बांधलेला राहायचा, गार्ड त्याला घट्ट करू शकायचा. त्याला लोखंडाची साखळी होती. त्याची दुसरी बाजू माझ्या मनगटावर बांधून होती. घाण जागेवर पडून असायची. प्राण्यांप्रमाणे ओढायचे. आजूबाजूला केवळ अंधार आणि मृत्यूची भावना होती. ही भीती कधीच सोडणार नाही. आता एक नवे ठिकाण, नव्या आयुष्यासाठी तयार आहे. मात्र, कोणत्या किमतीवर? वडील, कुटुंबाची भेट न घेताच येथे येण्यासाठी रवाना झाले. पाकिस्तान माझा देश आहे. माझे देशावर प्रेम आहे. मात्र कायमसाठी निर्वासित झाले. माझ्या सुटकेनंतरही ख्रिश्चनांसाठी वातावरण बदलले नाही.

दरमहा २००० ध्वज बनवते कंपनी, क्वालिटी कंट्रोल मॅनेजरही ठेवला आहे

तेहरान : अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या वादावर जगाचे लक्ष आहे. लष्करी अधिकारी सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये अमेरिकेविरोधात संताप आहे. इस्रायलसोबत त्यांचे जुने शत्रुत्व आहे. तर इंग्लंडला आधीपासून वादाचे मूळ मानतात. या देशांविरोधात इराणमध्ये निदर्शने होत असतात. मात्र एका कंपनीने त्याला मजेशीर उद्योगात रूपांतरित केले आहे. ही कंपनी खोमैन शहरात आहे आणि निदर्शकांना जाळता यावेत म्हणून केवळ अमेरिका, इंग्लंड आणि इस्रायलचे ध्वज बनवते. ही कंपनी दैबाचे मालक घासेम गंजानी सांगतात की, आम्हाला अमेरिका किंवा इंग्लंडच्या लोकांची अडचण नाही. आम्हाला त्यांचे सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांवर हरकत आहे. इस्रायलच्या लोकांनाही ते माहीत आहे. लाेक वेगवेगळ्या रॅलींमध्येही या देशांचे ध्वज जाळतात ते केवळ आपला विरोध दर्शवण्यासाठी.

ध्वज व्यवस्थित जळावा याची जबाबदारी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर रजई यांची आहे. त्या सांगतात, जनरल सुलेमानी यांच्या हत्येसारख्या अमेरिकेच्या भ्याड कारवाईविरोधात आम्ही एकच गोष्ट करू शकतो ते म्हणजे त्यांचा ध्वज जाळणे.

गंजानी यांच्या मतानुसार त्यांची कंपनी दरमहा सुमारे २ हजार ध्वज तयार करते. वर्षभरात सुमारे १६ लाख फूट कापड ध्वजासाठी वापरला जातो.