आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिची वेगळीच ‘केस’आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्लेषा महाजन

एका मैत्रिणीला टक्कल करून केसाविना डोकं पाहायची इच्छा होती. विकेशा असणे ही गोष्ट तशी साधीच नि तात्कालिक. टक्कल म्हणजे काही आयुष्याचा कडेलोट नाही. पण त्याचा किती बाऊ केला जातो! विकेशा अवस्थेत कुणी आपल्याला पाहिले तर त्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया असेल, हा विचारच व्याकूळ करणारा असतो. खूपसे पुरुष आपले विरळ केस वा टक्कल स्वीकारतात, पण स्त्रियांना ते अवघड जाते. जी गोष्ट पुरुषांसाठी नेहमीची असते, तीच गोष्ट स्त्रियांसाठी त्रासदायक असते. असे का? 
 
टक्कल पडलेल्या स्त्रिया संख्येने कमीच असतात. निसर्गानेच त्यांना सुकेशिनी असण्याचे वरदान दिले आहे. स्त्री म्हटली की तिच्या डोक्यावर केस हवेतच, असे आपल्या नजरेने ठरवूनच टाकलेले असते. पूर्वी काही समाजांमध्ये विधवेचे  केशवपन केले जाई. ही भयंकर प्रथा समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांनी बंद झाली. पण विशिष्ट वयानंतर किंवा विशिष्ट आजाराने स्त्रियांचे केस जाणे, कपाळ मोठे होणे, भांग फाटणे, टक्कल पडणे असे प्रकार होतात. तणावपूर्ण जीवन वा अानुवंशिकता हीही कारणे असतात. आहारतज्ज्ञ व त्वचारोगतज्ज्ञांकडे केसांसाठी उपचार घेणाऱ्या स्त्रियांची संख्या भरपूर असते. कॅन्सर, टायफॉइड  इत्यादी आजारपणांत पूर्ण केस जातात. किमोथेरपी, रेडिएशनमुळे हे दुष्परिणाम होतात. काही संवेदनशील निरोगी सुकेशिनी कॅन्सरग्रस्त विकेशा बायांसाठी आपले केस कापून देतात- विग बनवण्यासाठी.

काही जणी  तिरुपतीच्या देवाला वा अन्यत्र केस  वाहतात. काही धर्मांत साध्वी झाल्यावर केस उपटून टक्कल केले जाते.  काही जणी अमुक गोष्टीचा निषेध म्हणून टक्कल करून घेतात, तर काही जणी फॅशन  म्हणून अथवा चित्रपट-नाटकाची गरज म्हणून टक्कल करून घेतात. काही मोजक्या आधुनिक तरुणी/स्त्रिया बॉयकट किंवा सोल्जर कट करतात. त्या वेळी त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा नजर वळते.  मी एकदा एका ब्यूटी पार्लरमध्ये एका मॉडर्न तरुणीने टक्कल करून घेतलेले पाहिले. तिचा नुकताच ब्रेकअप झाला होता आणि बॉयफ्रेंडच्या विश्वासघाताचा निषेध म्हणून आपण टक्कल केले असून जसजसे डोक्यावर केस येतील, तसतशी मी ह्या आघातातून मुक्त होईन, असे ती म्हणाली. डोक्याला रुमाल न बांधता ताडताड पावले टाकत ती बाहेर पडली तेव्हा आम्ही साऱ्या अवाक् होत पाहतच राहिलो होतो. एका मैत्रिणीला टक्कल करून केसाविना डोकं पाहायची इच्छा होती.  तिने ती पूर्ण केली. ही वेगळीच ‘केस’ असून अशी उदाहरणे मोजकीच असतात. विकेशा असणे ही गोष्ट तशी साधीच नि तात्कालिक असते. टक्कल म्हणजे काही आयुष्याचा कडेलोट नाही. पण त्याचा किती बाऊ केला जातो! स्त्रिया (व काही पुरुषही) केसविहीन डोके रुमालात लपवतात. विकेशा अवस्थेत कुणी आपल्याला पाहिले तर त्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया असेल, हा विचारच व्याकूळ करणारा असतो. खूपसे पुरुष आपले विरळ केस वा टक्कल स्वीकारतात, पण स्त्रियांना ते अवघड जाते. जी गोष्ट पुरुषांसाठी नेहमीची असते, तीच गोष्ट स्त्रियांसाठी त्रासदायक असते. असे का? केसांचे अर्धवट उगवलेले खुंट पाहणे, त्याचा विचित्र हिरवट रंग व खरखरीत स्पर्श अनुभवणे स्त्रियांसाठी खूप धक्कादायक असते. कारण स्वत:ला वेगळं, अनावृत पाहण्याचे धैर्य ना त्यांच्यात असते, ना त्यांना पाहणाऱ्यांत.  ठरावीक साच्यातच आपण आपल्याला पाहू इच्छितो. सौंदर्याच्या, नॉर्मल असण्याच्या आपल्या कल्पनाही किती ठाशीव असतात! स्त्रियांनी व समाजानेही केसांविषयीची आपली नजर नि नजरिया बदलता येतोय का, ते जरूर पाहावे.

लेखिकेचा संपर्क : ९८६०३८७१२३