आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ashmit Patel And Mahek Chahal End Five Year Relationship, Had Engagement Two Years Ago

अश्मित पटेल आणि महक चहल यांनी संपुष्टात आणले पाच वर्षे जुने नाते, 2017 मध्ये केला होता साखरपुडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता अश्मित पटेल आणि महक चहल यांनी त्यांचे पाच वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार आपापसांतील मतभेदांमुळे हे दोघे वेगळे झाले आहेत. अश्मित 2004 मध्ये आणि महक 2005 मध्ये 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये झळकले होते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महकने अश्मितपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे. तर याविषयी अश्मित पटेलनेदेखील ते दोघे एकत्र नसल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, आम्ही यापुढे एकत्र नाहीत आणि सर्वांनी या आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा असे आवाहन करतो.

2017 मध्ये अश्मितने महकला स्पेनच्या व्हेकेशनदरम्यान प्रपोज केले होते आणि ऑगस्टमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. यानंतर दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते पण परस्पर वादांमुळे हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून स्वतंत्र राहू लागले. हे जोडपे लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. 


2003 मध्ये 'इंतेहा' चित्रपटातून पदार्पण करणारा अश्मित पटेल अखेर संजीव बालाथच्या 'हमारा तिरंगा' मध्ये दिसला होता.  तर महकने सलमान खानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटात काम केले होते.  महकचा अखेरचा चित्रपट 2018 मध्ये आलेला 'निर्दोष' हा होता.  

बातम्या आणखी आहेत...