आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खातेवाटपावरुन अशोक चव्हाण आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी ? अशोक चव्हाणांचा बैठकीतून काढता पाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खातेवाटपावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळत आहे

मुंबई- काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. हा खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काल मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. पण, या बैठकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 




मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी झाली. त्यानंतर अजित पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख केला. यावरुन अशोक चव्हाण संतापल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाहीत, मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे तुम्हाला जे बालयचे आहे, ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला, असं अशोक चव्हाण अजित पवारांना म्हटले.


त्यानंतर अजित पवारांनी परत पृथ्वीराज चव्हाणांचा विषय काढत ते संयमी नेते असल्याचे म्हटले. त्यावरुन वाद उफाळला. तसेच पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असेही अजित पवार म्हणाले. त्यावरुन चिडलेल्या अशोक चव्हाणांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याची माहिती आहे. यावरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिस्त आहे.