आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री 28 फेब्रुवारीला विधानसभा भंग करणार! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे भाकीत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच म्हणजेच २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा भंग करतील आणि लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होईल. त्यांची तयारी सुरू असल्याचे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी सिडकोतील राजीव गांधी मैदानावर काँग्रेसची सभा झाली त्या वेळी त्यांनी हे भाकीत वर्तवले. 


ते म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची तयारी सुरू आहे. म्हणून फडणवीस विधानसभा मुदतीपूर्वीच गुंडाळतील. आपण सज्ज असले पाहिजे. याबद्दलचा अधिक तपशील मात्र चव्हाण यांनी दिला नाही. ते म्हणाले की, या वेळी पुन्हा केंद्रात मोदी सरकार आले तर त्यानंतरच्या पाच वर्षांनी आपल्याला मतदानाचाही अधिकार शिल्लक राहणार नाही. गेल्या वेळी त्यांनी भरपूर घोषणा केल्या होत्या. आता येत्या काही दिवसांत पुन्हा घोषणांचा पाऊस पडेल. 

बातम्या आणखी आहेत...