आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा निरर्थक, 5 राज्यांतील निवडणुकांत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न-अशोक चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात या महिन्यात 25 तारखेला उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेसने या दौऱ्यावर टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्धव यांचा दौरा निरर्थक असल्याची टीका केली आहे. 


काय म्हणाले अशोक चव्हाण 
अशोक चव्हा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला काहीही अर्थ नाही. लोकांच्या हे लक्षात आले आहे की, आता 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकींच्या पार्श्नभूमीवर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. हा मुद्दा केवळ राजकीय स्वार्थासाठी उचलला जात असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 


अजित पवारांनीही केली होती टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखिल या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. ज्यांना आजवर स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राममंदिर काय बांधणार अशा शब्दांत अजित पवारांनी हल्ला चढवला होता. 

बातम्या आणखी आहेत...