आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LokSabha2019 ;नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी, काँग्रेसचा गड अशोक चव्हाणांनी गमावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- राज्यातील प्रतिष्ठेची लढाई मानला जाणारा नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला आहेत. भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार अशोक चव्हाणांचा तब्बल 50 हजार मतांनी पराभव केला आहे. नांदेडमधून चव्हाणांना 337285 मतं मिळाले तर प्रताप पाटील यांना 374355 मते मिळाले. यावेळी वचिंत फॅक्टर महत्त्वाचा ठरला कारण वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना 126086 मते मिळाली आहेत.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा महाराष्ट्रातून जवळपास सफाया झाला होता. एकही जागा मिळण्याची अपेक्षा नव्हती तेव्हा अशोक चव्हाण निवडून आले. तसेच हिंगोली येथील आणखी एका जागा काँग्रेसला मिळवून दिली. मोदी लाटेत काँग्रेसची प्रतिष्ठा जपणाऱ्या या नेत्याचा पराभव पक्षासाठी आणि एकूणच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे.