आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण आता पूर्णवेळ नांदेडातच; बालेकिल्ला टिकवण्यासाठी निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील स्वत:चा पराभव व प्रदेश काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुढील ३ महिने केवळ नांदेड जिल्ह्यावरच पूर्णवेळ लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे.  
नवा प्रदेशाध्यक्ष अद्याप नियुक्त झालेला नाही. त्यात मुंबई काँग्रेस अध्यक्ष देवरा यांनी राजीनामा दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी चव्हाणांकडे खासदारकी आणि प्रदेश अध्यक्ष अशी दोन्ही पदे होती. आता दोन्ही नाहीत. पत्नी अमिता यांच्या भोकर मतदारसंघातही विशेष मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल यांना अजूनही राज्यात चव्हाणांनीच काम पाहावे, असे वाटते. त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नसून विधानसभा त्यांच्याच नेतृत्वाखाली पार पडतील, असे चव्हाणांच्या गटातील काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.

 


प्रदेशाध्यक्षपदाचा अद्याप निर्णय नाही : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ३ नावांची शिफारस करण्यात आली असून बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसच्या देशभरातील १२ प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिलेले आहेत. मात्र, नियुक्त्यांचा निर्णय होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात यापुढे प्रदेशाध्यक्षाबरोबर राज्यात पाच विभागवार कार्याध्यक्ष नियुक्तीचा विचार आहे.

 

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम : अशोक चव्हाण  

कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार पाडण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासित राज्यांतील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू असून भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. 

 

राजीनामा नव्हे वर जाण्याची शिडी, निरुपमांचा देवरांवर हल्लाबोल

राजीनामा त्यागाच्या भावनेतून दिला जातो. इथे राजीनामा देताना राष्ट्रीय पद मागितले जाते आहे. हा राजीनामा आहे की वरती जाण्याची शिडी, अशी प्रश्नवजा टीका काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी रविवारी पदाचा राजीनामा देणारे मिलिंद देवरा यांच्यावर केली आहे. या टीकेवरून निरुपम आणि देवरा यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...