आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; राहुल गांधी घेेणार अंतिम निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीत पक्षाला अालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे  पाठवून दिला. ‘पक्षाध्यक्ष अाता जाे निर्णय घेतील ताे अाम्हाला मान्य असेल,’ असे चव्हाण यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले.


लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. २५ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली. खुद्द चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघातून माेठ्या फरकाने पराभव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी शनिवारी राजीनामा देण्याचे सूतोवाच केले होते. देशातही काँग्रेस पक्षाला माेठ्या प्रमाणावर अपयश आले आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याची भूमिका घ्यावी. त्यामुळे पक्षाला पुढील निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करता येईल तसेच नव्यांना संधी देता येईल, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे. त्यानुसार त्यांनी प्रदेशाध्यक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. फेररचनेत पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असेल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...