आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ashok Chavan's Wrong Answer Was Finally Corrected,} Different Answers Were Given In Both The Houses On The Question Of The Shiva Smarak.

चुकीच्या उत्तराची चव्हाणांनी केली अखेर दुरुस्ती, शिवस्मारकाच्या प्रश्नावर दोन्ही सभागृहांत दिली होती वेगवेगळी उत्तरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चुकीचे उत्तर गेल्याचे लक्षात आल्यानंतर अधिवेशन संपण्याला एक दिवस बाकी असताना उत्तरांतील विसंगती दूर केली

मुंबई - अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दोन्ही सभागृहात चक्क वेगवेगळी उत्तरे दिली होती. मात्र चुकीचे उत्तर गेल्याचे लक्षात आल्यानंतर अधिवेशन संपण्याला एक दिवस बाकी असताना शुक्रवारी सुधारीत उत्तर सादर करत उत्तरांतील विसंगती दूर केली.त्याचे असे झाले. शिवस्मारकाच्या निविदेतील गैरप्रकाराविषयी अलिबागचे शिवसेनेचे विधानसभेतील आमदार महेंद्र दळवी यांनी २५ फेब्रुवारी रोजी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण यांनी शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली नाही, असे म्हटले होते. हा प्रश्न ५३ क्रमांकावर होता. त्यामुळे तो चर्चेला आला नाही.शिवस्मारकासंदर्भातील तोच प्रश्न ४ मार्चला विधान परिषदेत लागला. राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी तो उपस्थित केला होता. हा प्रश्न ८ व्या क्रमांकावर होता. तारांकीत प्रश्न ६० ते ७० असतात. मात्र प्रश्नोत्तराला एक तासा असतो. त्यामुळे पहिले ७ ते ८ प्रश्नावर चर्चा होते. विधानपरिषदेत प्रश्न चर्चेला येणार असल्याने चव्हाण यांना रात्री त्यावर ब्रिफींग घेतले. त्यावेळी  प्रश्नाच्या उत्तरात गडबड असल्याची चूक लक्षात आली. त्यांनी रातोरात उत्तर बदलले आणि विधानपरिषदेतील चर्चे दरम्यान सकाळी सुधारित उत्तर सादर केले. शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेवर महालेखाकारांनी आक्षेप घेतले असून त्याची चौकशी केली जाईल, अशी ती सुधारणा होती.  मात्र निविदा प्रक्रियेत अनियमितता नाही, असे उत्तर त्यापूर्वी विधानसभेत दिलेले होते. चुकीची माहिती देणाऱ्यावर सदस्य हक्कभंंग आणू शकतात.  शिवस्मारक प्रकरणी सरकारचे दोन परस्पर विरोधी उत्तर सादर झाली होती.  नेमके कोणते, असा प्रश्न उपस्थित झाला असता. त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सुधारित उत्तर विधानसभेच्या पटलावर ठेवले आणि शिवस्मारकावरील प्रश्नाच्या उत्तरादरम्यान झालेली दुसरी चुक सुधारली.काय आहे अनियमितता ?

शिवस्मारकाची मूळ निविदा ३८२६ कोटींची होती. तत्कालीन फडणवीस सरकारने कंत्राटदार एल अँड टी कंपनीशी वैयक्तीक वाटाघाटी करुन किंमत २ हजार ५८१ कोटींवर आणली. स्मारकाची उंची २१० मीटर कायम ठेवली. मात्र छत्रपतींच्या पुतळ्याची ८३.२ मीटर उंची ७५.७ मीटर केली. आणि तलवारीची ३८ मीटर लांबी ४५.५ मीटर केली. यावर आक्षेप घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...