Home | Maharashtra | Pune | ashok chavhan criticism on BJP in satara

निवडणुकीत भाजपच्या पापाची हंडी जनताच फोडणार : अशाेक चव्हाण

दिव्य मराठी | Update - Sep 04, 2018, 06:34 AM IST

काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्य सरकारच्या कारभाराची प्रतीकात्मक दहीहंडी फाेडून निषेध

  • ashok chavhan criticism on  BJP in satara

    सातारा- काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्य सरकारच्या कारभाराची प्रतीकात्मक दहीहंडी फाेडून निषेध नाेंदवला. ‘सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी केली.


    चाैथ्या दिवशी काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा कराडमध्ये पाेहाेचली. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ‘प्रीतिसंगम’ या समाधिस्थळी सर्व नेत्यांनी अभिवादन केले. त्यानंतर यात्रेत सहभागी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडली. रहिमतपूर येथे सभेला मार्गदर्शन करताना अशाेक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Trending