आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदृश परिस्थिती नको, दुष्काळच जाहीर करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कमी पावसामुळे अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीची पेरणीही नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सांगून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. दुष्काळसदृश नको, तर दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


गांधी भवनात चव्हाण म्हणाले, राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. पण सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे. सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तत्काळ चारा छावण्या व टँकर सुरू करावेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, हे आता सिद्ध झाले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी, तरुण सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लिम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...