आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक कुमार साजरा करत नव्हते वाढदिवस, याच दिवशी झाले होते किशोरदांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारे दादा मुनी अर्थातच अशोक कुमार यांचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 1911 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आजच्या तरुणाईला त्यांच्याविषयी फारसे काही ठाऊक नसावे. दादामुनींनी 40चे दशक आपल्या अभिनयाने गाजवले होते. आम्ही तुम्हाला सांगतोय, या सुपरस्टारची कहाणी...
 
अशोक कुमार यांचे खरे नाव कुमुद लाल गांगुली होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खंडवा येथे झाले होते. त्यानंतर अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले आणि नंतर नोकरीच्या शोधात मुंबईत दाखल झाले.

 

1934 साली अशोक कुमार यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम सुरु केले. त्यांचा सिनेसृष्टीतील पदार्पणाचा किस्सा खूप रंजक आहे. बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू रॉय त्यांच्या पत्नी देविका राणीसोबत 'जीवन नैया' हा सिनेमा बनवत होते. या सिनेमाचे हीरो होते हुसैन. हिमांशू यांना संशय होता, की हुसैनचे त्यांची पत्नी देविकासोबत अफेअर सुरु आहे. या संशयापोटी त्यांनी हुसैनला आपल्या सिनेमातून काढून टाकले आणि अशोक कुमार यांनी लीड हीरो म्हणून काम करण्यास सांगितले. अशोक कुमार सुरुवातीला सिनेमात काम करण्यास तयार नव्हते, मात्र हिमांशू रॉय यांनी त्यांना काम करण्यास तयार केले.


'जीवन नैया' या सिनेमातील अशोक कुमार यांची भूमिका गाजली आणि त्यांना सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 1936 मध्ये आलेल्या 'अछुत कन्या' या सिनेमाने त्यांना स्टारपद बहाल केले. 1943 मध्ये अशोक कुमार यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारणे सुरु केले. 'किस्मत' या सिनेमात त्यांनी अँटी हीरोची भूमिका साकारली.

 

अशोक कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. मग ती 'महल'मधील भूमिका असो किंवा 'परिणिती'मधील एका प्रियकराची. 'चलती काम नाम गाडी'मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली.

 

अशोक कुमार यांच्याविषयीची एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते, की अशोक कुमार राज कपूर यांच्या लग्नात सहभागी झाले होते. अशोक कुमार येणार असल्याचे कळताच राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज यांनी डोक्यावरुन आपला पदर उचलला आणि अशोक कुमार यांना तुम्हाला भेटून मी खूप आनंदी झाले, असे म्हटले. अशाप्रकारे डोक्यावरचा पदर उचलल्याने राज कपूर पत्नी कृष्णावर नाराज झाले होते.

 

अशोक कुमार यांनी त्यांचे दोन्ही भाऊ अनुप कुमार आणि किशोर कुमार यांना इंडस्ट्रीत पाय रोवण्यास मदत केली होती. किशोर कुमार यांच्या गायक आणि अभिनेता बनण्यामागे अशोक कुमार यांचाच पाठिंबा होता. किशोर यांच्यावर अशोक कुमार यांचा खूप जीव होता.

 

13 ऑक्टोबर  1987 रोजी किशोर कुमार यांनी त्यांच्या थोरल्या भावाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठी पार्टी आयोजित केली होती. पार्टीत इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज पोहोचले. मात्र दुर्दैवाने याच दिवशी किशोर कुमार यांची प्राणज्योत मालवली. भावाच्या मृत्यूनंतर अशोक कुमार यांनी कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...