आंतरराष्ट्रीय / अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या रॅलीदरम्यान भीषण स्फोट, 26 जणांचा मृत्यू तर 42 जखमी

परवान प्रांतातील रॅलीजवळील कारमध्ये मॅग्नेटिक बॉम्ब विस्फोट झाला

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 09:39:00 PM IST

काबुल- अफगानिस्तानच्या मध्य परवान प्रांतात आज(मंगळवार) राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक रॅलीदरम्यान एका कारमध्ये भीषण विस्फोट झाला. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला तर 42 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानीक टोलो न्यूजने सांगितल्यानुसार कारमध्ये मॅग्नेटिक बॉम्ब होता, त्यातून हा स्फोट झाला.


अफगानिस्तानमध्ये 28 सप्टेंबरला राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या आधी दोन वेळेस निवडणुकीची तारीख बदलली आहे. अफगानिस्तानमध्ये सरकार आणि तालिबानदरम्यान अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. याआधी, शनिवारी राष्ट्रपती पदाचे उमेदवार गुलबुद्दीन हेकमतयार यांनी सांगितले होते की, काबुलमध्ये सत्तारूड सरकार देशात शांती स्थापित करण्यात अडचण आणत आहे.

X
COMMENT