आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टविनायक : गिरजेचा म्हणजेच पार्वती मातेचा आत्मज असल्याने गिरिजात्मज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे एकूण २८ लेणी आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून त्यास गणेश लेणी असे म्हणतात. सहाव्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे आवाजाचा प्रतिध्वनी सात वेळा उमटतो. लेणीत जाण्यासाठी ३२१ पायऱ्या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झाली आहे. मंदिराचा सभामंडप रेखीव व भव्य आहे. त्याला कोठेही खांबांचा आधार नाही. मूर्तीच्या मागचा भाग डोंगराने व्यापला असल्याने प्रदक्षिणा घालता येत नाही. मूर्तीस कोणतेही अंलकार नाहीत. या स्थानास कुकडी नदीचे सान्निध्य लाभले आहे. लेण्याद्री हे लेणी परिसराचे नाव आहे.

आख्यायिका : या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले, त्याच गुहेत तिने गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेणीच्या स्वरूपात आहे. येथील गणेश गिरजेचा म्हणजे प्रत्यक्ष पार्वती मातेचा आत्मज असल्याने त्यास गिरिजात्मज म्हटले जाते. गौतम ऋषीचा गणेशास येथे सहवास घडला. या अवतारात गणेशाने अनेक दैत्यांचा संहार केला. सतत १५ वर्षे गणेशाने येथे वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे माहात्म्य खूप थोर आहे.

जवळची ठिकाणे : माळशेजघाट थंड हवेचे ठिकाण व अभयारण्य, शिवनेरी किल्ला, प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक नाणेघाट.

बातम्या आणखी आहेत...