आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात भासवत मित्राच्या मदतीने केला पत्नीचा खून; चारित्र्यावर होता संशय  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात शस्त्राने वार करून खून केला. नंतर अपघाताचा बनाव करून अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याचे भासवले. अवघ्या १२ तासांत पोलिसांनी या बनवेगिरीचा पर्दाफाश केला. आष्टी येथील या घटनेत खुनाचा कट रचणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सोनाली नितीन आवारे (साप्ते) असे मृत महिलेच नाव आहे. तर पती नितीन आवारे (साप्ते) व भाऊसाहेब धाेंडे अशी आराेपींची नावे आहेत.
आष्टी शहरातील सोनाली आवारे (साप्ते) यांचा रविवारी सायंकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परंतु, पोलिसांना घातपाताचा संशय होता. हा अपघात नसल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन तपास केला. चौकशीत पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून संशयाची सुई सोनालीचा पती नितीनकडे गेली. अधिक चौकशीत पती, पत्नीत सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नितीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्र भाऊसाहेब धोंडे याच्या मदतीने आपण पत्नी सोनालीच्या खुनाची कबुली दिली. मुलगी प्रगती संदेश मुळीक हिच्या तक्रारीवरून नितीन आवारे व भाऊसाहेब धोंडे यांच्यावर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद केला. बातम्या आणखी आहेत...