आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ashutosh Gowarikar's 'Panipat' Accused Of Plotting Stories; Panipatkar Biswas Patil Made A Case, Claiming Seven Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशुतोष गोवारिकरांच्या 'पानिपत'वर कथा चाेरल्याचा आरोप; पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली केस, सात कोटींचा दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः आशुतोष गोवारीकर यांचा 'पानिपत' वादात अडकताना दिसत आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट यांच्यावर केस दाखल केली आहे. तंत्रज्ञानानुसार त्याला 'कमर्शियल आयपी सूट' म्हटले जाते. आयपी म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक संपदा आहे. दिव्य मराठीसोबत बोलताना विश्वास पाटील यांनी आपले मत व्यक्त केले...


'गेल्या वर्षी निर्माते रोहित शेलाटकर यांचे प्रतिनिधी संजय पाटील माझ्याकडे आले होते. ते या चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटरदेखील आहेत. लेखक म्हणून माझे नावदेखील त्यात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. हा चित्रपट कादंबरीवर आधारित असल्याचे लिहिले जाईल. तेव्हा मी तोंडी परवानगी दिली होती. त्यानंतर संजयने स्क्रिप्ट तयार केली. स्क्रिप्ट रीडिंग १५ ऑगस्ट २०१७ रोजी झाले होते. आता मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला कळाले, सर्व संवाद कांदबरीतून घेण्यात आले आहेत. मी त्या वेळी बेसिक प्रेमाइसची परवानगी दिली होती, मात्र येथे माझ्याच पुस्तकातील सर्व संवाद घेतले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्या वकिलानेही सात कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. पानिपतची तिसरी लढाई कादंबरीच्या रूपात लिहायला मला सहा वर्षे लागली. मी त्याचा प्रचंड अभ्यास केला होता. पराभवाचे मी विजयात रूपांतर केले. मराठे सैनिक कशा प्रकारे धाडसाने लढले हे मी कादंबरीत मांडले हाेते. नजीम खान, अब्दालीसारखी पात्रे माझ्या कादंबरीतील आहेत.

या आरोपाचे उत्तर मिळवण्यासाठी आम्ही आशुतोष गोवारीकर यांच्याशी संपर्क केला, मात्र बातमी लिहीपर्यंत त्यांच्या बाजूने कोणतेच उत्तर आले नव्हते.


'पानिपत' नावाने विश्वास यांच्या कादंबरीचे १० हिंदी आवृत्ती आणि ४१ मराठी अावृत्ती आली आहे. त्यांच्या कादंबरीवर एनएसडीचे डायरेक्टर वामन केंद्रे यांनी २० वर्षांपूर्वी 'रननगन' नावाने नाटक बनवले होते. त्याचे ४०० पेक्षा जास्त शो मराठीत आणि हिंदी झाले आहेत. त्यामुळे विश्वास यांना 'पानिपतकार'ची उपाधी मिळाली आहे.

यांच्यावरदेखील कथा चोरीचा आरोप

  • 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर'

या चित्रपटाचे प्रकरण लवादाकडे गेले होते. आरोप लावणारे मनोज मैरिता आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यात तडजोड झाली होती. या आधारे, क्रेडिट शीर्षकात मनोज मैरिताचे नाव आधी देण्यात आले. तसे हुसेन दलाल आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याबरोबरदेखील मैरिता यांचे नाव लिहिण्यात आले होते.

  • 'बाला'

या वर्षी मार्चमध्ये सुधीर मिश्रा यांचे सहायक राहिलेले कमल चंद्र यांनी 'बाला'च्या निर्मात्यांवर त्यांची कथा 'विंग' चोरल्याचा आरोप केला होता. एक कोटीच्या नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली होती. पण आतापर्यंत काहीच झाले नाही.

  • 'खानदानी शिफाखाना'

या प्रकरणात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अमिताभ पाराशरने टी-सिरिजवर केस दाखल केली होती. दोन कोटी रुपये मागितले होते, मात्र त्यांच्या बाजूने निर्णय आला नाही. चित्रपट रिलीजदेखील झाला आणि फ्लॉपही झाला.

तज्ञ काय म्हणतात... 
तज्ञांचे म्हणणे आहे की, पीडित व्यक्ती अनेकदा पुरावे सिद्ध करण्यात अपयशी ठरते. बऱ्याचदा अशी प्रकरणे अनेक वर्षे चालतात, तर काही प्रकरणांमध्ये तडजोड केली जाते.

बातम्या आणखी आहेत...