Home | Gossip | Ashutosh Rana and Renuka Shahane Love Story and Facts

घटस्फोटीत तरुणीच्या प्रेमात पडले होते आशुतोष राणा, वयाने 2 वर्षांनी मोठी असूनही केले लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 11:18 AM IST

फिल्मी आहे आशुतोष-रेणुकाची लव्ह स्टोरी

 • Ashutosh Rana and Renuka Shahane Love Story and Facts

  मुंबई. बॉलिवूड अॅक्टर आशुतोष राणा 51 वर्षांचे झाले आहे. 10 नोव्हेंबर, 1967 ला गाडरवारामध्ये आशुतोषचा जन्म झाला. आशुतोष आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखले जातात. आशुतोष यांनी करिअरच्या सुरुवातीला टीव्ही मालिका 'स्वाभिमान'मध्ये काम केले. पण 1998 मध्ये आलेल्या 'दुश्मन' चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. आशुतोष राणाच्या पर्सनल आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'हम आपके है कोण'मध्ये सलमानची वहिनी बनलेली अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्न केले आहे. रेणुका या पहिलेच घटस्फोटीत होत्या. त्यांनी यापुर्वी मराठी थिएटर डायरेक्टर विजय केनकरेसोबत लग्न केले होते.

  फिल्मी आहे आशुतोष-रेणुकाची लव्ह स्टोरी
  हंसल मेहता यांच्या एका सिनेमाच्या 'ट्रायल'वेळी आशुतोष राणा राजेश्‍वरी सचदेवसोबत आले होते. राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी आहेत. येथे ब-याच दिवसांनी राजेश्वरीशी भेट झाल्याने आशुतोष यांच्याकडे रेणुकाचे लक्षच गेले नव्हते. त्यावेळी राजेश्‍वरीनेच या दोघांची ओळख करुन दिली होती. त्यावेळी रेणुका यांनी आशुतोष यांचा 'दुश्‍मन' सिनेमा पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांना ती ओळखू शकली नाही. या पहिल्या भेटीला तिने मुळीच सिरिअसली घेतले नव्हते. त्या भेटीनंतर दोघे संपर्कात नव्हते. मात्र 17 ऑक्टोबर 1998 रोजी आशुतोष यांनी रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांचे वरचेवर फोन सुरू झाले. एरवी इतरांशी फारशा गप्पा न मारणा-या रेणुकाचे आशुतोष यांच्याशी वेव्ह लेंथ जुळू लागली. ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 डिसेंबर 1998 रोजी या दोघांची भेट झाली.


  आशुतोष यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितले, 'हीच योग्य मुलगी'..
  आशुतोष राणा यांच्या त्यांच्या गुरुंवर खूप विश्वास आहे. त्यांना ते दादाजी म्हणतात. त्यांच्या म्हणण्यावरुनच आशुतोष यांनी अभिनयात करिअरचा विचार केला. याच दादाजींनी "ही मुलगी तुला तुझ्यासाठी योग्य आहे'', असे सांगितले होते. एक दिवस आशुतोष यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली. खूप विचार करून होकार रेणुकाने आशुतोष यांना होकार दिला.

  रेणुकाच्या आईला आले होते टेंशन...
  आशुतोष राणा यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील एका छोट्या गावातील आहे. आशुतोष यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याने रेणुकाचे वडील आनंदी होते. मात्र तिच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. त्याचे कारण म्हणजे दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. शिवाय आशुतोष यांचे कुटुंब बारा जणांचे आहे. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

  मध्य प्रदेशमधल्या छोट्याशा गावात झाले लग्न...
  25 मे 2001 ही दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. लग्न आशुतोष यांच्या गावी होणार असे ठरले. गावी गेल्यानंतरचा अनुभव खूप विचित्र होता, असे रेणुका यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी झाले असे, की रेणुका आपल्या कुटुंबासोबत जेव्हा स्टेशनवर उतरली तेव्हा तिथे हजार-दीड हजाराचा जमाव होता. एखाद्या पक्षाचा राजकीय मेळावा असावा, असंच काहीसं दृश्य तिथे निर्माण झाले होते. ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती त्या हॉटेलचे उद्‌घाटनही रेणुकाच्या हस्ते झाले. लाईट नसल्याने अंधारातच रेणुकाला मेकअप करावा लागला. लग्नात इतकी गर्दी होती, की रेणुकाचे नातेवाईक इतकेच नाही तर आईवडीलसुद्धा मंडपापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. त्यामुळे रेणुकाच्या नणंदेने तिचे कन्यादान केले.

  संसारवेलीवर उमलेली दोन फुले...
  आशुतोष आणि रेणुका यांच्या लग्नाला आता जवळजवळ सतरा वर्षे झाली आहेत. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली आहेत. दोन मुलांचे ते आईवडील आहेत. शौर्यमन आणि सत्येंद्र ही त्यांच्या दोन्ही मुलांची नावे आहेत. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी रेणुकाने अभिनयापासून काही काळाचा ब्रेक घेतला. मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षानी म्हणजे 2008 मध्ये रेणुकाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. 'रिटा' या सिनेमाचे यशस्वी दिग्दर्शन तिने केले. याशिवाय 'झलक दिखला जा' या नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोमध्येदेखील आपल्या नृत्याची झलक दाखवली.

Trending