आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब भारत पाणीदार बनेगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यातल्या ठाणागाजी या छोट्याशा गावी नुकतंच ‘जल जन जोडो’ शिबिर पार पडलं. धावत्या पाण्याला चालायला, चालत्या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीमधे मुरवावं कसं याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या शिबिराचा मुख्य उद्देश. या शिबिरात सहभागी झालेल्या एका वाचकाचा हा अनुभव.


जेंद्रसिंह राणा. त्यांना मिळालेल्या पारितोषिकांची, सन्मानपत्रांची यादी व जीवनकार्य सांगत बसलो तर एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल. या वर्षात आपण सर्वांनी हे नाव खूपदा ऐकलं आहे. कारण, त्यांनी केलेले पाण्यासाठीचे कार्य एक हजार गावांसाठी नवी संजीवनी घेऊन आले आहे. जिथे राजस्थानात लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं तिथे ९०% लोक आज पारंपरिक शेती करून आपली उपजीविका उत्तम रीतीने भागवत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही जल-जन जोडो या अभियानांतर्गत पाण्याचे महत्त्व समजून सांगणाऱ्या शिबिरामध्ये गेलो होतो. देशभरातून एक हजार विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी नोंदणी केली होती. पण, त्यातील फक्त ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २० ते २५ डिसेंबर या कालावधीत राजस्थानातील अलवर िजल्ह्यामधील ठाणागाजी या एका छोट्याशा गावी असणाऱ्या तरुण भारत संघ विद्यापीठाच्या परिसरात हे संमेलन झालं. ठाणागाजी या गावी जाण्यासाठी अगदी या वर्षीपर्यंत पक्के रस्ते नाहीत. वीज तर अजून यायची बाकी आहे. अशी अनेक गावं या परिसरात आहेत. 


जल : म्हणजे पिण्याचे पाणी (ज्याने जीवन मिळते), जन : म्हणजे त्या प्रांतातील जनता (सर्वसामान्य लोक), आणि जोडो : म्हणजे एकत्र आणणे. असे हे जल जन जाेडो आंदाेलन.
पाण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर सर्वात आधी धावत्या पाण्याला चालायला शिकवलं पाहिजे, चालत्या पाण्याला थांबायला शिकवलं पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला धरतीमध्ये मुरायला शिकवलं पाहिजे ज्याने जमिनीची तहान भागेल. आणि ‘आतून जो भक्कम असतो तो बाहेरील संकटसुद्धा दूर करू शकतो,’ असं डॉ. राजेंद्रसिंह राणा (शिसोदिया) सतत म्हणतात.
आपण कोणाला विचारलं की, काय रे बाबा, पाण्याशी तुझा संबंध काय, तर त्याला विचार करावा लागतो आपला पाण्याशी संबंध आहे? खरंच की काय! पाणी वापरायचं इतकाच आपला संबंध. किंवा तू कोणत्या तीरावरचा, असा प्रश्न विचारला तर त्याला उत्तरं देताना विचार करावा लागेल किंवा आठवावं लागेल की, माझं गाव कोणत्या नदीवर वसलं आहे! अनेकांना तर ते सांगताही येणार नाही. काही जणांची उत्तरं येतील आधी होती एक. कोणती तरी, आता नाला झालाय. नाला होणं म्हणजे त्यांतील जैवविविधता संपून जाणं होय. थोडक्यात काय तर त्या नदीचं जीवन संपत चाललं आहे. आपल्या गावात किती तळी, डबकी होती, कोणाला माहीतही नाही. हे सगळं केव्हा माहीत होईल, जेव्हा लोक पाण्यावर प्रेम करतील तेव्हाच. जेव्हा लोकांना कळेल की, पाण्यामुळेच आपण जगू शकतो, शेती करू शकतो, जनावरांना भरपूर पाणीचारा देऊ शकतो, तेव्हा लोक पाण्यावर प्रेम करतील आणि पाण्याची काळजी घेतील. सध्या भारतातील पाण्याची स्थिती खूप वाईट आहे. मराठवाडा, विदर्भ, राजस्थान, बिहार, अशा खूप ठिकाणच्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीय. नासाच्या एका अहवालानुसार या दहा वर्षांत जर जमिनी पहिल्यासारख्या झाल्या नाहीत तर त्यांना पूर्ववत करण्यासाठी १०० वर्षं लागतील. पाण्यात पहिला जीव तयार होण्याच्या प्रक्रियेपासून आजपर्यंत पाण्याच्या अस्तित्वावर रोज अनेक अत्याचार होत आहेत. म्हणून पाणी कसं जपून वापरावं हे जाणण्यासाठी आपण एकदा तरुण भारत संघाला भेट दिली पाहिजे. पण ज्यांना जाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी काही गोष्टी यात नमूद करतो.


या शिबिरात आम्ही पाच दिवसांत रोज १२-१४ तास कठीण परिश्रम घेऊन पाण्याचे महत्त्व समजून घेतले. डॉक्टर राजेंद्रसिंह म्हणतात की, ‘साधारण माणसाला समजावे अशा शब्दांत तुम्ही पाण्याचे महत्त्व जेव्हा सांगताल तेव्हाच ते  लोकांच्या लक्षात येईल.’


डॉ. राजेंद्रसिंह यांच्या काही खास ओळी
आसमान में बादल गरजते हैं 
और उसमें से पाणी आता हैं।
पाणी धरती पर बरसता हैं। 
और मिट्टी को बहा कर ले जाता हैं।
और मिट्टी भी जाती हैं कहा।
एक दिन मुझे समझ आया।
की हम आपनी इस मिट्टी को रोक दे। 
तो पाणी भी रुक जायेगा।।
और पाणी वहा जायेगा।
जहाँ उसकी जरूरत हैं।
पाणी का सबसे बडा घर।
तो धरती का पेट हैं। 
जब धरती का पेट भर जायेगा।
तब भारत पाणीदार बनेगा।।


या ओळींमध्ये संपूर्ण शिबिर येतं. आपणही पाणी समजून घेतलं तर आपणही पाण्यावर प्रेम करू शकू. तेव्हा आधी आपण पाण्यावर प्रेम करायला शिकू कारण, जल ही जीवन है.
आता बघता बघता उन्हाळा येईल. आपण जर आतापासून पाणी जपून खर्च केलं तर ते नंतर कामाला येईल. 


धरती पण एक शरीर आहे आणि धरतीच्या पोटातील पाणी हे तिचं शुद्ध रक्त आहे. जसे आपल्या रक्तामुळे आपण जगतो तसे धरतीला पण तिचं पाणी (रक्त) लागतं. जसं लोक म्हणतात की, 
‘मैं ने मेरे खून पसीने की कमाई से ये सब बानाया हैं,’ वैसे धरती भी कहती हैं, की ये निसर्ग मैं ने मेरे खून पसीने की कमाई से बनाया हैं, एक बार ये चला जायेगा तो फिर वापस नही आ सकता हैं, इसे संभलकर रखो धरती के पूतो।
 

बातम्या आणखी आहेत...