आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आशुतोष यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. आशुतोष यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले, प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो. आपबरोबर माझा प्रवास चांगला राहिला आणि या क्रांतीकारी प्रवासाचा शेवटही झाला. मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने माझा राजीनामा स्वीकारावा अशी माझी पक्षाला विनंती आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटले की, आम्ही तुमचा राजीनामा कसा स्वीकारू शकतो? या जन्मात तरी नाही. सर आमचे तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. तर आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर कुमार विश्वास यांनी ट्वीट करत म्हटले, इतिहास शिशुपालच्या चुका मोजत आहे.
आशुतोष यांनी असेही लिहिले की, मी फक्त वैयक्तिक कारणामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला सहकार्य करण्यासाठी सर्वांचे आभार. माध्यमातील माझ्या मित्रांना विनंती आहे की, त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करावा. पत्रकार असलेल्या आशुतोष यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये दिल्लीतील चांदणी चौकातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. याठिकाणी त्यांच्या विरोधात भाजपचे डॉ. हर्षवर्धन विजयी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.