• Ashwin re entered in Top 10; Kohli slips below with 900 points after 2018

कसाेटी क्रमवारी / अश्विन पुन्हा टाॅप-१० मध्ये दाखल; काेहलीची २०१८ नंतर ९०० पाॅइंटच्या खाली घसरण

पहिल्या कसाेटीच्या दाेन्ही डावांत दाेन शतके साजरे करणाऱ्या राेहित शर्मालाही क्रमवारीत प्रगती साधता आली.

वृत्तसंस्था

Oct 08,2019 06:28:00 AM IST

दुबई - टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने आयसीसीच्या कसाेटी क्रमवारीतील आपले दुसरे स्थान कायम ठेवले. मात्र, त्याला रेटिंग पाॅइंटमध्ये फटका बसला. त्याची ९०० रेटिंग पाॅइंटमध्ये घसरण झाली. त्याचे आता ८९९ रेटिंग पाॅइंट झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्मिथ ९३७ रेटिंग पाॅइंटसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीची कसाेटी गाजवणाऱ्या ऑफ स्पिनर अश्विनने पुन्हा एकदा क्रमवारीत प्रगती साधली. त्याने पुन्हा टाॅप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याने सलामीच्या कसाेटीत १० बळी घेत क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती साधली आहे.


पहिल्या कसाेटीच्या दाेन्ही डावांत दाेन शतके साजरे करणाऱ्या राेहित शर्मालाही क्रमवारीत प्रगती साधता आली. त्याने १७ वे स्थान गाठले. त्याला ३६ स्थानांचा फायदा झाला. द्विशतक ठाेकणाऱ्या मयंकने क्रमवारीत २५ वे स्थान गाठले. या दाेन्ही फलंदाजांनी करिअरमध्ये पहिल्यांदा सर्वाेत्कृष्ट स्थान गाठले आहे.

X
COMMENT