आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतले रक्ताने माखलेले हात, नंतर रुमालाला पुसले आणि कुलूप लावून निघून गेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनागड - पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नीची हत्या करून मृतदेह घरात सोडून पती घराला कुलूप लावून फरार झाल्याची घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव किरण जोशी (41) आहे. त्या विसावदर पोलिस ठाण्यात तैनात होत्या. जुनागडमध्ये त्या पतीबरोबर राहत होत्या. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, किरणच्या सासरच्यांना तिची संपत्ती हवी होती. सोने आणि संपत्तीच्या लालचेपोटी तिची हत्या करण्यात आल्याला आरोप कुटुंबीयांनी केला आहे. किरणची मोठी बहीण भाजपची नगरसेविका आहे. तर दीरही पोलिसांत आहे तसेच सासरा निवृत्त पोलिस कर्मचारी आहे. पीडितेच्या बावाने तिचा पती पंकज वेगडा, दीर दीपक, सासरा भवानी शंकर आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली आहे. 


पती फरार, सासरच्या मंडळींची चौकशी 
पीएसआय किरणच्या सासू - सासरे आणि दीराची पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपी मात्र फरार असून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने रक्ताने माखलेले हात धुतले आणि नंतर खुर्चीवरील रुमालाला हात पुसले. त्या रुमालावर रक्ताचे डाग आढळले आहेत. 


रिप्लाय न आल्याने संशय 
तक्रारकर्ता आणि किरणचा भाऊ महेशभाईने पोलिसांना सांगितले की, 28 ऑक्टोबरच्या रात्री जुनागडहून मोठ्या बहिणीचा त्याला फोन आला. किरणचे दोन्ही पोन बंद येत असल्याचे तिने सांगितले. किरणचे पती, सासू-सासरे आणि दीराशी भांडण झाल्याचे समजताच महेशभाई किरणच्या घरी पोहोचले. मोठी बहीण शिल्पाही आली होती. घराचे दार लागलेले होते. त्यांनी इतर लोकांना बोलवून घराचे दार तोडले. आत किरणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. टेबलवर जेवणासाठी ताट वाढलेले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...