आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Asia Bibi: कहाणी त्या पाकिस्तानी महिलेची जी करतेय मृत्यूदंडाची प्रतीक्षा; पहिल्यांदाच सांगितली आपबिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानमध्ये एका महिलेला तहान काय लागली कोर्टात तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तिचा दोष फक्त एवढाच की ती एक ख्रिश्चन आहे. भर उन्हाच्या तडाख्यात काम करताना तिला तहान लागली आणि तिने मुस्लिम महिलांसाठी ठेवलेल्या पेल्यातून पाणी पिले. पाकिस्तानी लोकांनी तिला जाब विचारला तेव्हा तिने कथितरित्या येशू ख्रिस्त आणि पैगंबर मोहम्मद यांची तुलना केली. यावरूनच तिच्या विरोधात ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला. पाकिस्तानी कायद्यानुसार, या आरोपात तिला कोर्टाने 2010 मध्ये दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.


पाणी पिण्यावरून झाला होता वाद
> ही घटना पाकिस्तानात 2009 च्या उन्हाळ्यात घडली. त्यावेळी आसिया नूरीन आपल्या घराजवळ एका बागेत फालसा नावाचे छोटेसे फळ गोळा करत होती. त्याच दरम्यान तेथील महिलांशी तिचे भांडण झाले. न्यूयॉर्क पोस्टने आसियाच्या पुस्तकाचा दाखला देत दिलेल्या माहितीनुसार, ती 14 जून 2009 रोजी तेथे फालसा गोळा करत होती. त्यावेळी उन्हाळा होता आणि उष्ण वातारवणामुळे तिला तहान लागली होती. 
> आसियाने सांगितले, की आकाश आग ओकत होता. "दुपार होता-होता उकाळा इतका वाढला की मी घामाघूम झाले होते. तहान लागल्याने शरीराने काम करणे बंद केले होते." तिने पुढे लिहिले, "मी जेवळच असलेल्या एका विहीरीकडे गेले. त्या ठिकाणी असलेल्या बादलीने पाणी बाहेर काढले. मग तेथेच ठेवलेला ग्लास उचलला आणि त्यात पाणी पिले. माझ्या आसपास असलेल्या महिला सुद्धा तहानल्या होत्या. मी त्यांनाही ग्लास भर पाणी दिले. त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेने मला अडवले."


म्हणाल्या हा तर पैगंबरांचा अपमान 
महिलेने तिला पाणी पिण्यापासून रोखले कारण ते पाणी हराम होते. ख्रिस्ती महिलेने त्या पाण्याला स्पर्श करून अशुद्ध केले. त्यावर येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांनी या कार्यास एकाच नजरेतून पाहिले असते असे उत्तर आसियाने दिले. आसियाचे उत्तर ऐकूण महिलांनी एकच राडा केला. मोहम्मद पैगंबर यांची तुलना येशू ख्रिस्तांशी केलीच कशी असा जाब त्यांनी तिला विचारला. यातून इस्लामचा स्वीकार करूनच तू वाचू शकतेस असे तेथील महिलांनी सांगितले. पण, आसियाने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. मला आपल्या धर्मावर आस्था आहे आणि धर्म परिवर्तन करणार नाही असे तिने सर्वांना सांगितले. यानंतर तिने इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची तुलना करताना येशू ख्रिस्तांचे कौतुक केले. त्याच गोष्टीचा स्थानिकांना प्रचंड राग आला. 


सुप्रीम कोर्टात सुरू आहे सुनावणी
या संपूर्ण प्रकरणानंतर तिच्यावर पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला. 2010 मध्ये तिला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हापासूनच ती तुरुंगात आहे. आसियाचे वकील तिची शिक्षा माफ करण्यासाठी आणि तिच्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. 2016 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात तिच्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल केली. काही दिवसांपूर्वीच (8 ऑक्टोबर) रोजी आसियाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली. कोर्टाने त्यावरील निकाल सुरक्षित ठेवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...