Asia Cup मध्ये रोहित शर्मा सांभाळणार भारतीय संघाचे कर्णधार पद, विराट कोहलीला मिळाली विश्रांती
संयुक्त अरब अमिरातमध्ये 15 सप्टेंबरपासून सुरू होणारे आशिया चषक 28 सप्टेंबर पर्यंत खेळले जाणार आहे.
-
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने शनिवार आशिया चषकासाठी टीमची घोषणा केली आहे. त्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेट टीमचा रेगुलर कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी टीममध्ये खलील अहमद हा नवीन चेहरा दिसणार आहे. आशिया चषकात 6 संघ खेळणार आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकाचा समावेश आहे. सहावा संघ कोण होणार याचा निर्णय आशिया कप क्वालिफायरचे फायनल झाल्यानंतर कळेल. 6 सप्टेंबरला क्वालिफायर फायनल खेळला जाणार आहे. त्यामध्ये जिंकणारा संघ आशिया चषकासाठी पाठवला जाईल. संयुक्त अरब अमिरातमध्ये 15 सप्टेंबरपासून सुरू होणारे आशिया चषक 28 सप्टेंबर पर्यंत खेळले जाणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीवर कामाचा ताण अधिक आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. तिन्ही फॉरमॅट्समध्ये उत्कृष्ठ असलेल्या खेळाडूची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यावरच विचार करून विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर खेळाडूंचाही असाच विचार करून त्यांना देखील तात्पुरती विश्रांती दिली जाणार आहे. त्याची सुरुवात विराट कोहलीपासून झाली.
अशी आहे टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप कर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडेय, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद.