आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Asia Cup Analysis: भारताला एका दशकात तीन अाशिया कप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी न्यूज -  टीम इंडियाने शुक्रवारी सातव्यांदा अाशिया चषक पटकावला. विजयी माेहीम कायम ठेवताना भारताने फायनलमध्ये बांगलादेशावर राेमहर्षक तीन गड्यांनी मात केली. यासह  भारताने किताब पटकावला. भारताचा दशतकातील हा तिसरा अाशिया चषक ठरला. भारताने पहिल्यांदा हे यश संपादन केले.  यासह भारताने अाता पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये हाेणाऱ्या  वर्ल्डकप जिंकण्यासाठीचा दावाही मजबूत केला.  


तीन किताब पहिल्यांदा : भारताने एकाच दशकामध्ये तीन वेळा किताब जिंकण्याचा पराक्रम पहिल्यांदा गाजवला. भारताने २०१०, २०१६ व अाता २०१८ मध्ये अाशिया चषक पटकावला. यापूर्वी एकाच दशकात दाेन वेळा दाेन किताब भारताने पटकावले हाेते.

 

राेहित-धवन सलामी जाेडी हिट

राेहित शर्मा व शिखर धवन ही सलामीची जाेडी यंदाच्या स्पर्धेत सुपरहिट ठरली. त्यांनी सलामीला सर्वाधिक एकूण ४३७ धावांची भागीदारी केली. यामध्ये एक शतक व दाेन अर्धशतकीय भागीदारीचा समावेश अाहे. धवनने वैयक्तिक ३४२ धावा काढल्या.  भारताच्या सलामीच्या जाेडीने सहा सामन्यांत ९१ च्या सरासरीने ५४७ धावा काढल्या. तसेच हाँगकाँगविरुद्ध सामन्यात सलामीच्या राहुल अाणि रायडूने १९१ धावांची भागीदारी केली हाेती. 

 

अाता नेतृत्वास तयार : राेहित

अाता फुल टाइम नेतृत्वासाठी तयार अाहे. सहकारी खेळाडूंच्या अव्वल कामगिरीमुळे मला किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवता अाले. त्यामुळे मला अागामी स्पर्धेत अशीच अव्वल कामगिरी करता येईल, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार राेहित शर्माने दिली. काेहलीने विश्रांती घेतल्याने अाशिया चषकासाठी राेहितकडे  नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली हाेती. 

 

धवन, राेहितला डच्चू; मयंकची कसाेटी मालिकेसाठी निवड  
४ अाॅक्टाेबरपासून  भारत अाणि विंडीज यांच्यातील दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे. या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घाेषणा करण्यात अाली. विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली यजमान भारताचा संघ  काैशल्य पणास लावणार अाहे.  इंग्लंड दाैऱ्यात सुमार खेळी करणाऱ्या शिखर धवनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. यातून त्याला  मालिकेला मुकावे लागेल.  जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती देण्यात अाली. तसेच राेहितलाही संघाबाहेर करण्यात अाली. या मालिकेसाठी संघात मयंक अग्रवालची निवड करण्यात अाली.


भारतीय संघ : विराट काेहली (कर्णधार), लाेकेश राहुल, पृथ्वी शाॅ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, अार. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, माे. शमी, उमेश यादव, सिराज, शार्दूल ठाकूर.

 

बातम्या आणखी आहेत...