आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया खंडाची 'सुवर्ण कन्या' ठरली विनेश फोगाट, 10 वर्षांची असताना झाली होती वडिलांची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताची महिला पहिलवान विनेश फोगाट हिने 18व्या आशियाई स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय पहिलवान ठरली. यापूर्वी विनेशने 2014 इंचियोन एशियन गेम्समध्ये कांस्य पदक मिळवले होते. पण यावेळी मात्र तिने सुवर्ण कामगिरी करत क्रीडा जगताला तिच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे. 

 

अडचणींनी भरलेले जीवन 
लहानपणापासून एशियन गोल्डमध्ये मेडल मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा विनेशसाठी अत्यंत खडतर ठरला आहे. तिच्या जीवनातील वैयक्तिक अडचणींचा सामना करताना अगदी धैर्याने जीवनाला सामोरे जाण्याचे कसब ती शिकली होती. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी जमिनीच्या वादातून तिचे वडील राजपाल यांची हत्या झाली. ही विनेशच्या जीवनातील सर्वात दुःखज घटना होती. पण विनेशचे मोठे काका महावीर फोगाट यांनी ये रिकामेपण भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विनेशला पहिलवान बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीला यश आले आणि विनेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलवान बनली. 


दुखापतीनेही घेतली परीक्षा 
कुस्तीमध्ये करिअर घडवत असतानाही विनेशला अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पायाच्या दुखापतीमुळे विनेशच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले होते. पण विनेशने या प्रसंगालाही सामोरे जात मार्गक्रमण सुरू केले. फिट झाल्यानंतर तिने नव्याने तयारी सुरू केली आणि 2018 मधील गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर आता 18व्या एशियन गेम्समध्ये 'गोल्ड मेडल' जिंकत तिने इतिहास रचला आहे. 


2020 ऑलिम्पिकवर नजर 
23 वर्षांच्या विनेशने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई केली आहे. 2014 आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने गोल्ड मेडल जिंकले. इंचियोन एशियन गेम्समध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली. याशिवाय विनेशने एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीन सिलव्हर आणि दोन ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...