आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेल्थ डेस्क - 18व्या एशियाड स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी पहिलवान बजरंग पुनियाने भारताला गोल्ड मेडलची कमाई करून दिली. त्याने फ्रीस्टाइल 65 किलो वजनगटात फायनलमध्ये जपानच्या पहिलवान तकातानी डियाचीला 11-8 ने पराभूत केले. बजरंग आशियाई खेळांमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा भारताचा 9वा पहिलवान बनला आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला प्रचंड मोहनतही करावी लागली आहे.
14 व्या वर्षी सिनिअर्सला द्यायचा टक्कर
1994 मध्ये जन्मलेल्या बजरंग यांनी लहानपणापासूनच ध्येय ठरवले होते. वयाच्या 14 व्या वर्षापासून तो पद्मश्री पुरस्कारप्राप्त पहिलवान योगेश्वर दत्तबरोबर ट्रेनिंग करत होता. योगेश्वरपेक्षा 11 वर्षांनी लहान बजरंग रनिंग, ट्रेनिंग, जिममध्ये सीनिअर्सला टक्कर द्यायचा. योगेश्वर म्हणाला की, 2008 मध्ये बजरंगने त्यांच्याबरोबर ट्रेनिंग सुरू केले पण तो चांगली टक्कर देत होता.
डाएटमध्ये ठेवले, दूध-दही
बजरंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, हरियाणाच्या मातीत पहिलवान घडवण्याचा गुण आहे. लहानपणापासून ते दूध, दही खाऊन मातीत खेळण्यासाठी पळायचे. अर्धे पहिलवान तर यामुळेच बॉडी कमावतात. मातीत कुस्ती व्हायची तेव्हा आम्हाला त्याचे पैसेही मिळायचे. त्यामुळेच कुस्ती खेळायचा जायचो. आजही त्यांनी दूध, दही आणि तूप यांचा डाएटमध्ये समावेश ठेवला आहे.
दोरी, टायरपासून कमावली बॉडी
बजरंगने जिममध्ये तासनतास मेहनत करत शरीर कमावले. डंबेल्स आणि वेट प्लेट तो एकाचवेळी उचलायचा. जिमबरोबरच देशी स्टाइलनेही तो व्यायाम करतो. त्यात ट्रॅक्टरचे टायर उचलून त्याला उलटे पुलटे करून दोरीबरोबर खेळायचा. या व्यायामांनी तो एवढा चपळ बनला की, त्यांच्या उंचीएवढ्या उंचीवर तो दोन पावले धावूनही चढायचा. तसेच पाठीवर एका जणाला बसवून तो पुशअप्स मारायचा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.