आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशियन चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेत भारतीय संघाची नजर दुसऱ्यांदा सेमीफायनलमधील प्रवेशावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मस्कत - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या चॅम्पियन भारतीय संघाला अाता एशियन चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी अाहे. भारताचा चाैथा सामना अाज मंगळवारी मलेशियाशी हाेईल. 


भारताने नुकतीच स्पर्धेत विजयाची हॅट््ट्रिक साजरी केली. भारताने स्पर्धेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात जपानला धूळ चारली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने ९-० ने सामना जिंकला. मनदीप सिंगने (४,४९,५७ वा मि.) गाेलची हॅट््ट्रिक नाेंदवून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. तसेच हरमनप्रीत सिंगने (१७, २१ वा मि.) दाेन गाेल केले. याशिवाय गुरजंत सिंग (८ वा मि.), अक्षयदीप (३६ वा मि.), सुमीत (४२ वा मि.) व ललितने (४५ वा मि.)प्रत्येकी एक गाेल केला. यामुळे भारताला माेठ्या फरकाने विजयाची नाेंद करता अाली. 


जपानचा सलग दुसरा पराभव 
जपानच्या टीमला अापली पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही. त्यामुळे जपानने सलग दुसरा सामना गमावला. दक्षिण काेरियापाठाेपाठ भारतीय संघाने सामन्यात जपानवर मात केली. अाता जपानच्या टीमला बुधवारी पाकच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. 


अाज विजयी चाैकाराची संधी 
अाता भारताला स्पर्धेत विजयी चाैकाराची संधी अाहेे. भारताचा चाैथा सामना अाज मंगळवारी मलेशियाशी हाेईल. सलगच्या दाेन विजयांच्या बळावर मलेशिया संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले अाहे. भारताने सलगच्या तीन विजयांनी गुणतालिकेत ९ गुणांसह अव्वल स्थान गाठले अाहे. भारताने यापूर्वी भारताने यजमान अाेमानसह पाकिस्तानचाही पराभव केला. अाता जपानपाठाेपाठ मलेशियालाही धूळ चारण्याचा भारतीय युवांचा मानस अाहे. 

बातम्या आणखी आहेत...