Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Asian Games 2018: 20 years after women's hockey won Silver medal

दाेन राैप्यसह चार कांस्यपदकांची कमाई, सेलिंगमध्ये तीन पदके जिंकली; हाॅकीत सुवर्ण हुकले

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 07:10 AM IST

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताला ६ पदके मिळाली. महिला हॉकीत २० वर्षांनंतर रौप्यपदकाची कमाई झाली.

 • Asian Games 2018: 20 years after women's hockey won Silver medal

  जकार्ता- युवा खेळाडू वर्षा, श्वेता अाणि हर्षा ताेमरने अव्वल कामगिरीच्या अाधारे शुक्रवारी १८ व्या एशियन गेम्समध्ये भारतीय संघाला सेलिंगमध्ये तीन पदके मिळवून दिली. यामध्ये एका राैप्यसह दाेन कांस्यपदकांची नाेंद अाहे. याशिवाय जाेश्नाच्या सरस खेळीच्या बळावर भारतीय महिला स्क्वॅश संघाने फायनलमध्ये धडक मारली. यासह या संघाने अाता चॅम्पियन हाेण्याचा दावाही मजबूत केला. दरम्यान, गत चॅम्पियन भारतीय पुरुष संघाला स्क्वॅशमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघाला उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. तसेच भारतीय महिला संघाला हाॅकीमध्ये राैप्यपदकाची कमाई करता अाली. या संघाला फायनलमध्ये जपानने २-१ ने पराभूत केले.


  याशिवाय भारताच्या प्रतिभावंत बाॅक्सर अमित फांगलने अापल्या वजन गटाच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह ताे यंदाच्या स्पर्धेतील बाॅक्सिंग गटात अंितम फेरी गाठणारा पहिला भारतीय बाॅक्सर ठरला. त्यापाठाेपाठ बाॅक्सर विकास कृष्णनने सलग तिसऱ्यांदा एशियन गेम्समध्ये पदक पटकावले. ताे अाज ७५ किलाे वजन गटात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. यासह त्याने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत पदक जिंकण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. यासह ताे एकमेव ठरला.


  ठक्कर-गणपतीला कांस्यपदक
  भारताच्या ठक्कर अाणि गणपतीने पुुरुषांच्या ४९ इअार सेलिंगमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यांनी ४३ गुणांसह तिसरे स्थान गाठले.


  १६ वर्षीय हर्षिता तिसऱ्या स्थानावर
  भारताची १६ वर्षीय जलतरणपटू हर्षिता ही महिलांच्या सेलिंग प्रकारात कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिने ४.७ गुणांसह तिसरे स्थान गाठले.


  बाॅक्सिंग : अमित फायनलमध्ये
  भारताच्या अमित फांगलला अाता पुरुषांच्या ४९ किलाे लाइट फ्लायवेटच्या गटात अाता गाेल्डन पंच मारण्याची संधी अाहे. यापासून ताे अवघ्या एका पावलावर अाहे. त्याने या गटाची फायनल गाठली. त्याने शुक्रवारी उपांत्य सामन्यात फिलिपाइन्सच्या कार्लाे पालमचा पराभव केला. अमितने ३-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह ताे अंतिम फेरीत दाखल झाला. अाता त्याचा अंतिम सामना उझबेकिस्तानच्या हासनबाॅय दुस्माताेव्हशी हाेईल.


  विकासची पदकांची हॅट‌्ट्रिक
  बाॅक्सर विकास कृष्णनला डाेळ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे सेमीफायनलच्या लढतीतून माघार घ्यावी लागली. मात्र, त्याने पुरुषांच्या ७५ किलाे वजन गटात अापल्या नावे कांस्यपदकाची नाेंद केली. यासह त्याने विक्रमालाही गवसणी घातली. सलग तीन अाशियाई स्पर्धांत पदक जिंकणारा विकास हा भारताचा पहिला बाॅक्सर ठरला. त्याने यापूर्वी २०१० च्या ग्वांगझू येथील स्पर्धेत पुुरुषांच्या ६० किलाे वजन गटात सुवर्णपदक पटकावले हाेते. तसेच त्यानंतर त्याने २०१४ च्या इंचियाेन अाशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.


  स्क्वॅश : महिलांना ‘सुवर्ण ’ संधी
  भारतीय महिला संघाला अाता स्क्वॅशमध्ये चॅम्पियन हाेण्याची माेठी संधी अाहे. भारताच्या या संघाने शुक्रवारी सांघिक गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. या संघाने उपांत्य सामन्यात मलेशियावर २-० ने विजय संपादन केला. जाेश्नाने महिलांच्या गटात पाच वेळच्या चॅम्पियन निकाेल डेव्हिडला धूळ चारली. तिने १२-१०, ११-९, ६-११, १०१२-, ११-९ ने सामना जिंकला. यासह तिने भारताकडून विजयाचे खाते उघडले.

Trending