Home | Sports | From The Field | Asian Games 2018 Day-8 live news And update

एशियाड: टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांनी कतारचा उडवला धुव्वा, अनू-मुर्मू 400 मीटर हर्डलच्या फायनलमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 10:47 AM IST

टेबल टेनिसच्या महिला वर्गात भारताने कतारचा 3-0 ने धुव्वा उडवला.

  • Asian Games 2018 Day-8 live news And update
    भारताने आतापर्यंत 6 सुवर्ण, 5 रजत आणि 16 कांस्य पदके जिंकली.
    एशियाडच्या 8व्या दिवशी रविवारी 35 सुवर्ण पदकांवर नजर.

    जकार्ता - 18व्या आशियाई खेळांच्या 8व्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. टेबल टेनिसच्या महिला वर्गात भारताने कतारचा 3-0 ने धुव्वा उडवला. भारतीय खेळाडू मौमा दासने कतारच्या महा अलीला 11-3, 11-2 आणि 11-4 ने हरवले. आहिका मुखर्जीने आइआ मोहम्मदला 11-2, 10-12, 11-2, 11-3 आणि सुतिर्था मुखर्जीने महा फरामर्जीला 11-3, 11-3, 11-6 ने धूळ चारली.

    अॅथलेटिक्सच्या 400 मीटर हर्डलमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. 400 मीटर हर्डल इव्हेंटच्या हीट 2 मध्ये अनु राघवन तिसऱ्या स्थानावर राहिली. दुसरीकडे हीट 1 मध्ये जौना मुर्मू चौथ्या स्थानावर राहिली. दोघीही आता सुवर्ण पदकासाठी कामगिरी करतील.

Trending