Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Asian Games 2018: India records 67 years of best performance!

Asian Games 2018: भारताची 67 वर्षांतील सर्वाेत्तम कामगिरी, हॉकीत पाकचा उडवला धुव्‍वा

वृत्तसंस्था | Update - Sep 02, 2018, 08:54 AM IST

यंदा भारताला अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावताना हा यशाचा पल्ला गाठता अाला.

 • Asian Games 2018: India records 67 years of best performance!
  भारतीय पुरुष हाॅकी संघाला तिसरे कांस्यपदक; पाकिस्तानचा २-१ ने केला पराभव

  जकार्ता - भारताच्या २२ वर्षीय बाॅक्सर अमित फांगलने १८ व्या एशियन गेम्समध्ये गाेल्डन पंच मारून एेतिहासिक सुवर्णपदक पटकावले. भारताचे यंदाच्या स्पर्धेच्या बाॅक्सिंगमधील हे पहिलेच पदक ठरले. दुसरीकडे प्रणव वर्धन अाणि शिवानाथने ब्रिजमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. गत चॅम्पियन भारतीय महिला स्क्वॅश संघाने राैप्यपदक पटकावले. त्यापाठाेपाठ गतविजेत्या भारतीय पुरुष हाॅकी संघाने सर्वाेत्तम कामगिरी नाेंदवली. यासह भारताने अापल्या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. यासह भारताचा संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला. भारताच्या पुरुष हाॅकी संघाचे हे तिसरे कांस्यपदक ठरले.


  अाज रविवारी या स्पर्धेचा समाराेप हाेणार अाहे. यादरम्यान हाेणाऱ्या पथ संचलनात महिला हाॅकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वात भारताचे पथक सहभागी हाेईल.
  भारतीय संघाने स्पधॅेच्या १४ व्या दिवशी शनिवारी चार पदके जिंकली. यामध्ये दाेन सुवर्णांसह प्रत्येकी एका राैप्य अाणि कांस्यपदकाचा समावेश अाहे. अाता भारताची एकूण ६९ पदके झाली अाहेत. यामध्ये १५ सुवर्णपदकांची नाेंद अाहे. भारताची ही ६७ वर्षांतील सर्वाेत्तम कामगिरी ठरली. यंदा भारताला अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावताना हा यशाचा पल्ला गाठता अाला.

  यंदा भारताचे माेठे पथक सहभागी झाले हाेते. या खेळाडूंनी ३६ खेळ प्रकारात अापले नशिब अाजमावले. मात्र,यातील केवळ १७ खेळांमध्येच भारताला पदकांची कमाई करता अाली. भारताची ब्रीजमधील कामगिरी काैतुकास्पद ठरली अाहे.

  भारताचा पाकवर १० वा विजय, २-१ ने जिंकला सामना
  गतचॅम्पियन भारतीय संघाने अापल्या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा अापला दबदबा कायम ठेवला. भारताने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पाकिस्तानचा २-१ अशा फरकाने पराभव केला. अाकाशदीप (तिसरा मि.) अाणि हरमनप्रीत सिंग (५० वा मि.) यांनी प्रत्येकी एका गाेलच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तसेच भारताचा पाकविरुद्धचा हा दहावा विजय ठरला. अातापर्यंत दाेन्ही संघांत एकूण १६ सामने झाले. यातील सहा सामन्यांत पाकने विजयाची नाेंद केली. तर, भारताने दहा सामने जिंकून अापले वर्चस्व अबाधित ठेवले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रणव-शिवाने मिळवून दिले १५ वे सुवर्णपदक...

 • Asian Games 2018: India records 67 years of best performance!

  प्रणव-शिवाने मिळवून दिले १५ वे सुवर्णपदक   
  भारताच्या प्रणव वर्धनने अापल्या सहकारी शिवानंदसाेबत साेनेरी यश संपादन केले. त्यांनी ब्रिज प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यांनी पुरुषांच्या दुहेरीत गटात हे पदक पटकावले. यादरम्यान ६० वर्षीय प्रणव अाणि ५६ वर्षीय शिवानंदने फायनलमध्ये सर्वाधिक ३८४ गुण संपादन केले. यासह भारताचे हे दाेघेही सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.तसेच या गटात चीनच्या यांग अाणि गांग चेनने ३७८ गुणांसह राैप्यपदक पटकावले. तसेच मॅक अाणि लाइ वाई ही जाेडी कांस्यपदकाची मानकरी ठरली.  भारताचे या इव्हेंटमधील हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी भारताने याच खेळात दाेन पदके जिंकली अाहेत.   

   

 • Asian Games 2018: India records 67 years of best performance!

   सुनयना ३१ मिनिटांत पराभव
  भारतीय महिला संघाच्या प्रतिभावंत खेळाडू सुनयनाला ३१ मिनिटांत पराभवाचा सामना करावा लागला. तिला हाँगकाँगच्या अव्वल मानांकित लाेक जी हाेने पराभूत केले. या खेळाडूने ३-१ अशा फरकाने
  सामना जिंकला.

 • Asian Games 2018: India records 67 years of best performance!
  भारताचे यंदाच्या स्पर्धेत बाॅक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक; अमितचा अाॅलिम्पिक चॅम्पियन दुस्माताेवला ठाेसा

Trending