आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजकार्ता- एशियन गेम्स 2018 मध्ये भारताने आपले पदक मिळवले आहे. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारच्या जोडीने कांस्य पदक जिंकले. फायनलमध्ये भारतीय जोडीने 429.9 चा स्कोअर केला. या स्पर्धेतचे सुवर्ण पदक चिनी तैपेईच्या जोडीने 494.1 गुण (एशियन गेम्स रिकॉर्ड) मिळवून जिंकले. इलिमेनेशनच्या काठावर गेलेल्या चीनने शानदार पुनरागमन करत 492.5 गुण मिळूवन रजत पदकावर ताबा मिळवला.
भारतीय महिला कबड्डी टीमने रविवारी जकार्तात 18व्या एशियाई खेळांमध्ये आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. भारतीय टीमने ग्रुप-एमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात जपानला 43-12 ने पराभूत केले. भारतीय महिला कबड्डी टीम एशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जकार्ता 2018 एशियाई खेळांच्या पहिल्या दिवशी भारताला शूटिंग आणि कुस्तीतून पदकांची अपेक्षा आहे. महिलांच्या ट्रॅप शूटिंगच्या क्वालिफाइंग सामन्यांना सुरुवात झाली आहे. यात सीमा तोमर आणि श्रेयसी सिंह आहेत. पुरुषांच्या ट्रॅप क्वालिफाइंग सामन्यात मानवजितसिंह संधू आणि लक्ष्य आपला निशाणा आजमावतील. याशिवाय कुस्तीत भारताकडून 2 वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकणारे सुशील कुमार, बजरंग पुनिया, पवन कुमार आणि मौसम खत्रींवर सर्वांच्या नजरा आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.