Home | Sports | Other Sports | Asian Games 2018 Live Updates Day 8 Duti Smashes PT Usha Record With Silver In 100 M Race

दुतीने रचला इतिहास; हिमा,अनसला राैप्यपदक, विराेधानंतरही फवादने केली एेतिहासिक घाेडदाैड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 27, 2018, 07:03 AM IST

भारतीय संघाने रविवारी १८ व्या एशियन गेम्समधील अापली पदक जिंकण्याची माेहीम कायम ठेवली. भारताने स्पर्धेच्या अाठव्या दिवशी

 • Asian Games 2018 Live Updates Day 8 Duti Smashes PT Usha Record With Silver In 100 M Race

  जकार्ता- भारतीय संघाने रविवारी १८ व्या एशियन गेम्समधील अापली पदक जिंकण्याची माेहीम कायम ठेवली. भारताने स्पर्धेच्या अाठव्या दिवशी सात पदकांची कमाई केली. यामध्ये पाच राैप्यसह दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. २२ वर्षीय महिला धावपटू दुती चंदने १०० मीटरमध्ये भारतासाठी एेतिहासिक यश संपादन केले. तिने तब्बल १९८६ नंतर भारतीय संघाला या स्पर्धेच्या १०० मीटरमध्ये राैप्यपदक मिळवून देण्याचा पराक्रम गाजवला.त्यामुळे अाता पी.टी. उषानंतर या गटात एशियन गेम्समध्ये पदक जिंकले. तसेच १८ वर्षीय धावपटू हिमा दास अाणि अनसने ४०० मीटरमध्ये राैप्यपदकाची कमाई केली. यासह भारताने अॅथलेटिक्समध्ये तीन राैप्यपदके पटकावली. लक्ष्मणन हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला हाेता. मात्र, त्याला पंचांनी अपात्र घाेषित केले.


  यंंदा भारताने पहिल्यांदाच सहभागी करण्यात अालेल्या ब्रिज खेळ प्रकारात पदकाची नाेेंद केली. यामध्ये भारतीय संघाने दाेन कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे महासंघ अाणि फेडरेशनच्या प्रचंड विराेधानंतरही भारतीय संघ घाेडस्वारीच्या इव्हेंटसाठी स्पर्धेत सहभागी झाला हाेता. याच विराेधाला दूर सारत घाेडेस्वार फवाद मिर्झा अाणि पुरुष संघाने दाेन राैप्यपदके भारताला मिळवून दिली. अाता भारताला बॅडमिंटनमध्येही पदकाची संधी अाहे. सायना अाणि सिंधूने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. युवा तिरंदाज रजत चाैहान, अमन सैनी अाणि अभिषेक वर्माने अाता १८ व्या एशियन गेम्समधील भारतीय संघाचे पदक निश्चित केले. या तिघांनी पुरुष कंपाउंडच्या सांघिक गटाची उपांत्य फेरी गाठली.


  घाेडस्वारीमध्ये फवाद मिर्झाचा डबल धमाका, वैयक्तिक व सांघिक गटात पटकावले राैप्य
  फेडरेशन अाणि महासंघाने घाेडस्वारी फवाद मिर्झासह सांघिक गटातील टीमच्या या स्पर्धेतील प्रवेशला प्रचंड विराेध केला हाेता. याच विराेधातून सावरत या खेळाडूंनी दाेन राैप्यपदकाची कमाई केली. यामुळे भारताला ३६ वर्षंानंतर या इव्हेंटमध्ये पदक जिंकता अाले. फवाद मिर्झाने वैयक्तिक गटात राैप्यपदक पटकावले. त्याने सेनाेर मेडिकाेट नावाच्या घाेड्यासाेबत दुसरे स्थान गाठले. त्याने जम्पिंगच्या फायनलमध्ये २६.४० गुणांची कमाई केली.

  १८ वर्षीय हिमाचा नवा विक्रम, जिंकले राैप्यपदक
  भारताच्या युवा धावपटू हिमा दासने महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीमध्ये राैप्यपदक पटकावले. तिने ५०.७९ सेकंदात निश्चित अंतर पुर्ण केले. यासह ती दुसऱ्या स्थानावर राहिली. यामुळे तिला राैप्यपदकाने गाैरवण्यात अाले. दरम्यान, कामगिरीचा दर्जा उंचावत तिने राष्ट्रीय विक्रमाला मागे टाकले. या गटात नासिर ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिने ५०.०९ सेकंदांत अंतर गाठताना एशियन गेम्समध्ये विक्रमी धाव घेतली. कझाकिस्तानच्या एलिनाने कांस्यपदक पटकावले.

  गतचॅम्पियन अनसची ४५.६९ सेकंदांची धाव; अाता राैप्यपदक
  भारताच्या गत चॅम्पियन २३ वर्षीय माे. अनसला अापले किताबावरचे वर्चस अबाधित ठेवता अाले नाही. कामगिरीचा दर्जा घसरल्याने त्याला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने पुरुषांच्या ४०० मीटरमध्ये दुसरे स्थान गाठले. त्याने ४५.६९ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. यामुळे ताे राैप्यचा मानकरी ठरला. त्याने गत स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले हाेते.


  ब्रीज : भारतीय संघाला दाेन कांस्य; पुरुष अाणि मिश्र गटात मिळाले यश
  भारतीय संघाने रविवारी ब्रीज प्रकारामध्ये शानदार दाेन पदके मिळवली. यामध्ये दाेन्ही कांस्यचा समावेश अाहे. भारताने मिश्र अाणि पुरुष सांघिक गटात हे यश संपादन केले. यासह भारताने या खेळ प्रकारात पदकाचे खाते उघडले. किरण नादर, सत्यनारायण बाचीराजू, हेमा देवरा, गाेपीनाथ मन्ना, हिमानी खंडेलवाल अाणि राजीव खंडेलवालने मिश्र गटात अव्वल कामगिरी करताना भारताला पदक मिळवून दिले. त्यांना उपांत्य फेरीत थायलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यातूनच भारताचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यानंतर पुरुष गटात जग्गी शिवदासानी, राजेश्वर तिवारी, सुमीत मुखर्जी, देवाब्रत, राजू ताेलानी अाणि अजय खडेने भारताचे कांस्यपदक निश्चित केले. सिंगापूरने भारताचा पराभव केला. ब्रीजचा यंदा प्रथमच या स्पर्धेत सहभाग करण्यात अाला. यामध्ये भारताने पहिल्याच वेळी दाेन पदकांची कमाई केली.


  पी.टी. उषांनतर अाता दुतीला पदक
  दुती चंदने भारताला महिलांच्या १०० मीटरमध्ये राैप्यपदक जिंकून दिले. तिने १९८६ मधील पी. टी. उषाच्या पदकानंतर भारताला हे यश मिळवून दिले. तिने ११.३२ सेकंदांत ही शर्यत पुर्ण केली.

  सायना, सिंधू सेमीफायनलमध्ये; प्रथमच एकेरीचे पदक निश्चित
  अाॅलिम्पिक पदकविजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अाणि पी. व्ही. सिंधूने अव्वल कामगिरी करताना रविवारी भारतासाठी एेतिहासिक विजयाची नाेंद केली. त्यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये शानदार प्रवेश केला. यासह त्यांनी भारतीय संघाचे या गटातील पदकही निश्चित केले. त्यामुळे भारताला पहिल्यांदा या गटात पदकाची कमाई करता येणार अाहे. अाता या दाेघींकडून भारताला साेनेरी यशाची अाशा अाहे.


  सायनाचे ४० मिनिटांत पदक निश्चित
  माजी नंबर वन सायना नेहवालने अवघ्या ४० मिनिटांत अापले पदक निश्चित केले. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये थायलंडच्या रत्नाचाेक इतानाेनवर मात केली. तिने सरस खेळी करताना २१-१८, २१-१६ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने दाेन्ही गेममध्ये अाक्रमक खेळी केली. यातून तिला हा शानदार विजय साकारता अाला. अाता तिला उपांत्य सामन्यात विजयासाठी माेठी झंुज द्यावी लागणार अाहे. तिच्यासमाेर या सामन्यात कटटर प्रतिस्पर्धी ताई जु यिंगचे अाव्हान असेल. या दाेघी सेमीफायनलमध्ये समाेरासमाेर असतील. मात्र, या सामन्यातही बाजी मारून सुवर्णपदकाचा दावा मजबूत करण्याचा सायनाचा मानस अाहे. यासाठी अापण अधिक मेहनत घेणार असल्याचेही तिने विजयानंतर सांगितले. अाता तिच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

  सिंधू ६१ मिनिटांत विजयी
  जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये थायलंडच्या नितचाअाेन जिंदापाेलचा पराभव केला. तिने ६१ मिनिटांमध्ये सामना जिंकला. तिने २१-११, १६-२१, २१-१४ ने सामना जिंकला. यासह तिला उपांत्य फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. तिने दमदार सुरुवात करताना पहिला गेम अवघ्या १७ मिनिटांत जिंकला अाणि लढतीत अाघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर जिंदापाेलने लढतीत बराेबरी साधली. त्यामुळे सिंधूला तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा अाक्रमक खेळी करावी लागली. यातून तिने हा गेम जिंकून सामना नावे केला.

 • Asian Games 2018 Live Updates Day 8 Duti Smashes PT Usha Record With Silver In 100 M Race
 • Asian Games 2018 Live Updates Day 8 Duti Smashes PT Usha Record With Silver In 100 M Race
 • Asian Games 2018 Live Updates Day 8 Duti Smashes PT Usha Record With Silver In 100 M Race

Trending