आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Asia's First Inter Gender Hand Transplant; Shreya Was Put On The Hands Of A Man, Now Doctors Are Also Surprised To Change The Skin Color

दोन्ही हात गमावले, त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी श्रेयाला बसवले पुरुषाचे हात, आता त्वचेचा रंग बदलल्याने डॉक्टरही अचंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशियातील पहिला इंटर जेंडर हँड प्रत्यारोपित; तरुणीस पुरुषाचे हात, ओळखूही येत नाही.
  • नव्या हाताने दिली परीक्षा, डॉक्टर म्हणाले, सखोल अभ्यास हवा

पुणे - दुर्घटनेत दोन्ही हात गमावलेल्या पुण्याच्या श्रेया सिद्दनागौडा हिला डॉक्टरांनी पुरुषाचे हात बसवण्याची कल्पना सांगितली तेव्हा क्षणभर तीही दचकली. परंतु, काेणताही पर्याय नसल्याने तिने सहमती दर्शवली. या निर्णयाबाबत श्रेया सांगते... नवे हात मोठे, सावळ्या रंगाचे व जड हात होते. त्यावर केसही खूप होते. रुंद मनगटे, पुरुषी बोटे होती. आता अडीच वर्षांनंतर श्रेयाच्या शरीराने या हाताचा स्वीकार केला आहे. त्यांचा रंगही श्रेयाच्या रंगाशी मिळता-जुळता आहे. त्यावर आता केसही नाहीत.’ श्रेयाची आई सुमा म्हणाल्या, ‘हे हात पुरुषांचे आहेत, हे कोणीच ओळखू शकत नाही. श्रेया आता बांगड्या घालते व नेल पॉलिशही लावते.’ या बदलामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटते आहे.  २०१६ मध्ये श्रेया पुण्याहून कर्नाटकातील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजीला जात असताना बस उलटली. तिचे दोन्ही हात संवेदनाहीन झाले. उपचारास विलंब झाल्याने दोन्ही हात कापावे लागले. तेव्हा तिचे वय १८ वर्षांचे होते. श्रेयाने प्रोस्थेटिक हात वापरण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांनंतर श्रेयाने केरळमधील एका रुग्णालयात प्रत्यारोपणाची माहिती वाचली. श्रेया म्हणाली, “आम्ही समन्वयकांची भेट घेतली. त्यांनी दाता मिळत नसल्याची अडचण सांगितली. त्यामुळे निराश झालो. परंतु एका तासातच फोन आला की, एर्नाकुलम येथे एका विद्यार्थ्यास अपघात झाला असून त्याचा ब्रेन डेड घोषित केले आहे. त्याचे कुटुंबीय हात दान करण्यास तयार होते. त्याच दिवशी ९ ऑगस्ट २०१७ रोजी ३६ डॉक्टरांच्या पथकाने १३ तासांत हाताचे प्रत्यारोपण केले. आशियातील पहिला इंटर जेंडर हँड ट्रान्सप्लांट होता. दीड वर्षे फिजियोथेरपी घ्यावी लागली. हातात बदल एमएसएच नावाच्या हार्मोन्समुळे बदल होतात, असे डॉ. सुब्रमण्यम यांनी सांगितले. नव्या हाताने दिली परीक्षा, डॉक्टर म्हणाले, सखोल अभ्यास हवा


श्रेया सांगते, प्रत्यारोपण करताना शरीर व हाताचा रंग वेगळा होता. परंतु ते माझे हात आहेत, याचे समाधान हाेते. डॉ. सुब्रमण्यम अय्यर यांनी सांगितले, श्रेयाच्या केसमध्ये आम्ही कलर कोडिंगची तपासणी करत आहोत. केस समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तिच्यातील बदल अचंबित करणारे आहेत. श्रेया इंजिनिअरिंग सोडून अर्थशास्त्रात बीए करते आहे.