Home | Maharashtra | Vidarva | Akola | Asif Khan's drone research; Three arrested

आसिफखान यांचा ड्रोनद्वारे शोध; फरार तिघांना कारंजा येथून अटक

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 05:48 AM IST

आसिफ खान मुस्तफा खान यांचे अपहरणातून खून होऊन सात दिवस उलटले. मात्र त्यांचा मृतदेह अजून सापडला नाही.

  • Asif Khan's drone research; Three arrested

    अकोला - आसिफ खान मुस्तफा खान यांचे अपहरणातून खून होऊन सात दिवस उलटले. मात्र त्यांचा मृतदेह अजून सापडला नाही. बुधवारी ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी पूर्णा नदीकाठावर शोध मोहीम राबवली. तर फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने कारंजातून अटक केली.

    आर्थिक वादातून आसिफ खान यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची कबुली वाशीमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती अनिल गणेशपुरे, त्यांचा मुलगा वैभव, बहिणीचा मुलगा स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडे यांनी तपासादरम्यान पोलिसांना दिली. तर फरार असलेले अशोक सावतकर, सैय्यद वारिस सैय्यद हुसेन व रामदास पखाडे या तिन्ही आरोपींना कारंजा येथून बुधवारी सकाळी अटक केली. तिन्ही आरोपींना मूर्तिजापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रामेश्वर चव्हाण, पीएसआय योगेंद्र मोरे, पीएसआय रणजितसिंह ठाकूर, एएसआय दिनकर बुंदे, पोकॉ. प्रमोद डोईफोडे, संदीप काटकर, शक्ती कांबळे, भाऊलाल हंबरडे, मनोज नागमते, अनिल राठोड, अश्विन सिरसाट यांनी केली.

    सोबत बघितला होता अकोल्यात फ्लॅट : सुत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आसिफ खान आणि ज्योती गणेशपुरे यांनी सोबत अकोल्यात फ्लॅट बघितला होता. हा फ्लॅट त्यांना एका दलालाने दाखवला होता. आसिफ खान यांच्या अपहरणापूर्वी त्या दलालाचे कॉल आसिफ खान यांना आले होते. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली असता दोघांचाही नवीन फ्लॅट विकत घेण्याचा इरादा होता, मात्र त्या दलालाची चौकशी अजून केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Trending