आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story:6 कोटींची डायमंड रिंग देऊन या CEO ने केला होते असिनला प्रपोज, लग्नात घडला होता मेलोड्रामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री असिनचा आज वाढदिवस आहे. तिने आज वयाचे 32 वर्षे पुर्ण केले आहेत. 26 अक्टोबर 1985 मध्ये तिचा जन्म झाला. सध्या आसिन लाइमलाइटपासून दूर आहे. 2016 मध्ये असिनने मायक्रोमॅक्स कंपनीचे संस्थापक राहुल शर्म यांच्यासोबत लग्न केले. 19 जानेवारी रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर असिनने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे. आता या कपलला एक वर्षांची गोंडस मुलगी आहे.

 

अशी आहे असिन-राहुलची लव्ह स्टोरी.. 
राहुल आणि असिन यांच्या लव्हस्टोरीतील खरा हीरो अभिनेता अक्षय कुमार आहे. अक्षयने जर दोघांची भेट घालून दिली नसती, तर ही स्टोरी कदाचित झालीच नसती. असिन व राहुल पहिल्यांदा 2012 मध्ये मुंबई एअरपोर्टवर भेटले होते. असिन तेव्हा एका टूर्नामेंटमध्ये 'हाउसफुल 2' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. अक्षय कुमारही तिच्यासोबत होता. यादरम्यान अक्षय कुमारने राहुलची असिनला ओळख करून दिली. अक्षय व राहुल चांगले मित्र आहेत. या टूर्नामेंटचे स्पॉन्सर राहुल शर्मा यांची कंपनी होती.

 

6 कोटींची रिंग देऊन राहुल यांनी असिनला केले होते प्रपोज
राहुल शर्मा यांनी आपल्या लेडी लव्हला फिल्मी स्टाइलमध्ये अर्थात गुडघ्यांवर बसून प्रपोज केले होते. बेल्जियमहून मागवलेली 20 कॅरेटची सॉलिटेयर रिंग देऊन राहुलने असिनला आपल्या भावना कळवल्या होत्या. या अंगठीचे बाजार मुल्य सहा कोटी रुपये आहे. अंगठीत बसवलेल्या हीर्‍याच्या खाली लव्हकपलचे इनीशियल्स AR (असिनचा A व राहुलचा R) मोनोग्राम बनवले होते.

 

दोन पद्धतीने झाले असिन-राहुलचे लग्न... 
19 जानेवारी 2016 रोजी दिल्ली येथे दोन पद्धतीने असिन आणि राहुल बोहल्यावर चढले होते. सकाळी सकाळी ख्रिश्चन पध्दतीने तर रात्री दोघांनी हिंदू पध्दतीने दोघांनी सप्तपदी घेतल्या होत्या.


दोन तास चालल्याहोत्या हिंदु धर्माच्या विधी...

- असिन आणि राहूलच्या लग्नासाठी हिंदु धर्माच्या विधी दोन तास चालू होत्या. 
- संध्याकाळी 6:30 वाजता लग्नसोहळा सुरु झाला आणि जवळपास 8:30 वाजता संपला. 
- लग्नादरम्यान हॉटेलमध्ये केवळ आमंत्रित करण्यात आलेल्या लोकांना प्रवेश मिळाला होता. 
- या जोडीला आपले लग्न प्रायव्हेट ठेवायचे होते. म्हणून मीडियाला गेटच्या बाहेरच अडवण्यात आले होते. 
- कोणत्याच मीडिया पर्सनला हॉटेलमध्ये एंट्री देण्यात आली नव्हती. 
- पाहूण्यांमध्ये असिन आणि राहुलचे कुटुंबीय, नातेवाईक आणि काही परिचीत लोक सामील झाले होते. 
- फिल्म इंडस्ट्रीमधून केवळ अक्षय कुमारच या लग्नात आला होता.

 

जेव्हा परत गेले होते लग्न लावण्यासाठी आलेले 21 पंडित...
- असिनच्या लग्नादरम्यान एका मोठा ड्रामासुध्दा पाहायला मिळाला होता.
- वेडिंग सेरेमनी दिल्लीच्या लग्झरी हॉटेल 'दुसित देवरान'मध्ये चालू होती. 
- परंतु सप्तपदीच्या विधीसाठी आलेले 21 पंडित नाराज होऊन विधी पूर्ण न करताच तिथून निघून गेले. 
- पंडित अमरेश मिश्राने सांगितल्याप्रमाणे, 'मंगळवारी रात्री सप्तपदीची विधी पूर्ण करण्यासाठी आम्ही 21 पंडितांसोबत बातचीत केली होती. वेडिंग कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला म्हणाला, 2100 रुपये दक्षिणा मिळेल. परंतु आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तर आम्हाला सांगितले, की केवळ 500 रुपये मिळतील.'
- त्यामुळे आमचे सहकारी नाराज झाले आणि निघून गेले. 
- अमरेश यांनी सांगितले होते, 'आम्ही आमच्या खर्चाने हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. परंतु आम्हाला सांगण्यात आले, की असिन-राहुलच्या लग्नासाठी कमी वयाचे पंडित हवे आहेत.'

 

कोणत्या कॉस्ट्युममध्ये दिसली होती असिन...
- ख्रिश्चन पध्दतीने झालेल्या वेडिंग सेरेमनीमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्स मिळून 50 लोक उपस्थित होते. यामध्ये अक्षय कुमार सामील झाला होता.
- रात्री दोघे हिंदू धर्मानुसार लग्नगाठीत अडकले. यादरम्यान जवळपास 200 पाहूणे सामील झाले होते. 
- डिनर पूर्णत: इंडियन आणि शाकाहारी होते. डिनर हॉटेलच्या लॉन एरिया तसेच बॉलरुममध्ये ठेवण्यात आले होते.

 

23 जानेवारीला मुंबईत झाले होते ग्रॅण्ड रिसेप्शन...
- 19 जानेवारी रोजी लग्नानंतर 23 जानेवारीला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवण्यात आले होते.
- बॉलिवूड आणि बिझनेस क्षेत्रातील दिग्गज असिन आणि राहुल यांना शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. 
- प्रभूदेवा, अभिषेक बच्चन, सुश्मिता सेन, शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा, जॅकलिन फर्नांडिस, तब्बू, मनीष पॉल, आर. बाल्की, चेतन भगत, अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते.


असिन आणि राहुल शर्मा यांचा Wedding Album बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....

बातम्या आणखी आहेत...