आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असित मोदींनी सांगितले नवीन वर्षातील प्राधान्य, 2020 मध्ये परतेल दयाबेन आणि पोपटलालचे होईल लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे निर्माते असित मोदी यांनी 24 डिसेंबर रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी जेव्हा असितशी आम्ही बातचित केली, तेव्हा त्यांनी शोमध्ये दयाबेनचे पात्र परत आणणार असून पोपटलालच्या लग्नाला नवीन वर्षात प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या वाढदिवशी 'तारक मेहता ...' मराठी भाषेत 'गोकुळधामाची दुनियादारी' म्हणून प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवारी प्रसारित होईल. आपल्या वाढदिवशी शो मराठीत सुरु होण्याबद्दल असित म्हणाले, "हा योगायोग आहे."

  • माझ्यासाठी हे मोठे यश

मराठी भाषेत लोकप्रिय कार्यक्रम आणणे या वर्षाचे ते एक यश मानत आहेत.  शो बद्दल 2020 मधील खास नियोजनाबद्दल असीत म्हणाले, "काही विशेष घडत नाही.  सर्वांना सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा, मला हेच पाहिजे आहे. होय, माझी इच्छा आहे की 'तारक मेहता ...' परदेशातही वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केले जावे. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. कारण जगात असा कौटुंबिक कार्यक्रम नाही ज्यामध्ये सकारात्मक विचारसरणी आहे आणि सर्वजण एकत्र बसून पाहतात. याविषयीची अधिक बोलणी सुरु आहे.'

  • पोपटलाल यांचे लग्न आणि दयाबेनचे कमबॅक

बातचितदरम्यान, जेव्हा असित यांना विचारले की, प्रेक्षक यात काही पात्रांची प्रतीक्षा करीत आहेत. ते कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर देताना असित म्हणाले - "पुढच्या वर्षी पात्र परतणे आवश्यक आहे." मग पोपटलाल यांचे लग्न करणे किंवा दयाबेनचे पात्र लवकरात लवकर आणणे याला माझे प्राधान्य असेल. नवीन वर्षात दयाबेनचे पात्र आले पाहिजे. हे पात्र कोण साकारणार, याविषयी आम्ही चर्चा करत आहोत. मी याविषयी तुम्हाला योग्य वेळी सांगेन. मला वाटते की 2020 मध्ये मी पोपटलालचे लग्न लावेल.'

बातम्या आणखी आहेत...