आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे : 'देशाची अर्थव्यवस्था ढासळते आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. कॉर्पोरट घोटाळ्यांपासून विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विनाश आणि पुनर्वसनाच्या समस्या दिवसेंदिवस जटील होत असताना निवडणुकीच्या प्रचारात हे मुद्देच नाहीत. विरोधी पक्ष पुरेसा सक्षम नाही. मतदारांनी केवळ मतदानाचे कर्तव्य बजावण्यापुरता मर्यादित सहभाग ठेवून चालणार नाही. सत्ताधाऱ्यांना विकासाच्या मुद्द्यावर जाब विचारावा,' अशी अपेक्षा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.
जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयच्या सुनीती सु.र. व विश्वंभर चौधरी यावेळी उपस्थित होते. पाटकर म्हणाल्या, 'केवळ आरोप-प्रत्यारोपावरच निवडणूक लढवली जातेय. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची विरोधी पक्षांची स्थिती राहिलेली नाही. जनतेचे प्रश्न निवडणुकीच्या पटलावर आणण्यासाठी आम्ही राजकीय पक्षांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. जनतेनेही विचार करूनच मतदान करावे,' असे त्या म्हणाल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.