आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मी, मानस पदार्पणातच चॅम्पियन; सिद्धीने पटकावले सलग दुसरे राैप्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी : महाराष्ट्राच्या युवा जिम्नॅस्ट अस्मी बडदे अाणि मानस मनकवलने पदार्पणातच खेलाे इंडियामध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. या दाेघांनीही अापापल्या गटात सुवर्णपदकाची केली. याशिवाय गत सुवर्णपदक विजेत्या युवा खेळाडू सिद्धीने अापली पदकाची लय कायम ठेवताना सलग दुसऱ्या दिवशीही बाजी मारली. तिने शुक्रवारी राैप्यपदक पटकावले. तिचे हे स्पर्धेतील सलग दुसरे राैप्यपदक ठरले. तसेच अस्मीने ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये अाणि मानसने पॉमेल हॉर्स प्रकारात सोनेरी यश संपादन केले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे व सिद्धी हात्तेकर यांनी रुपेरी यश मिळवत महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व राखले. महाराष्ट्राच्याच मेघ रॉय व सलोनी दादरकरने कांस्यपदकाची कमाई केली. यासह महाराष्ट्राने पदक जिकंण्याची लय कायम ठेवली.

चुरशीने झालेल्या सर्वसाधारण विभागात १७ वर्षांखालील गटात अस्मीने ४३.८० गुणांची कमाई केली, तर श्रेयाला ४०.८० गुण मिळाले. या दोन्ही खेळाडूंनी चेंडू व दोरीच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या. या कसरती करताना त्यांनी उत्तम प्रकारे तोलही सांभाळला. अस्मी ही प्रथमच खेलो इंडिया स्पधेर्साठी पात्र ठरली होती. तिने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण व एक रौप्यपदकाचा मान मिळवला आहे. श्रेयाने गतवर्षी या स्पर्धेसह राष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे.

अस्मी व श्रेया या दोन्ही खेळाडू ठाणे येथे पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. अस्मी ही १४ वर्षीय खेळाडू ठाणे येथील ज्ञानसाधना विद्याामंदिर प्रशालेत शिकत आहे. तिरंदाजीत मुलींच्या १७ वर्षांखालील गटातून ईशा पवारला सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. रिकर्व्हमध्ये आॅलिंपिक पात्रतेचे स्वप्न बाळगणारी २१ वर्षांखालील गटातील तिशा संचेती देखील वर्चस्व राखून आहे.

१४ वर्षीय युवा खेळाडू मानसला सुवर्णपदक

१७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मानस मनकवले याने मुलांच्या पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक जिंकताना स्वप्नवत कामगिरी केली. या प्रकारात त्याने सुरेख लवचिकता दाखवताना अप्रतिम कसरती केल्या. तो ठाणे येथे सरस्वती क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. १४ वर्षीय मानसची ही पहिलीच खेलो इंडिया आहे. त्याला १०.६५ गुण मिळाले. त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत.

व्हॉलीबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुली पराभूत

व्हॉलीबॉलमध्ये २१ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राचा पराभव झाला. केरळने त्यांचा २५-२१, २५-१३, २५-८ असा तीन सेटमध्ये पराभव केला. केरळच्या मुलींनी जोरदार स्मॅशिंग व भक्कम बचाव याचा सुरेख सन्मवय ठेवीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना फारशी संधी दिली नाही. पहिल्या सेटपासूनच केरळने आपला दबदबा निर्माण केला होता.

सिद्धीला पदक

अाैरंगाबादच्या सिद्धी हत्तेकरने १७ वर्षांखालील गटात खेळताना नावावर आणखी एका पदकाची नोंद केली. तिने टेबल व्हॉल्ट प्रकारात रौप्यपदक मिळवले. पहिल्या दिवशी तिने सर्वसाधारण प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. तिला रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...