आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझायनिंगमध्ये दिसेल आकर्षक रंगसंगती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथे कोट्यूर फॅशन वीकमध्ये डिझायनर अंजू मोदी यांची नुकतीच भेट झाली. त्यांनी सांगितले की, ‘राम लीला’ हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रियंका चोप्रा असेल की नाही हे अजून ठरले नसले तरी प्रियंका आणि सुप्रिया पाठक यांना डोळ्यांपुढे ठेवून राजस्थानी आणि कच्छ थीमवरील पेहरावांचे डिझाइन त्या करीत आहेत.
त्या म्हणाल्या की, ‘जेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’सारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयातून मला फोन आला तेव्हा विश्वासच बसला नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे आणि मीडियापासून चार हात लांब राहूनच काम करते. मला मार्चमध्ये फोन आला होता आणि भेटायला बोलावले होते. मी एक्साइट झाले होते. चित्रपटासाठी काम करू शकेन की नाही याची थोडी भीतीही होती. चर्चेनंतर एखादवेळी नकार मिळण्याचीही शक्यता होती.’
भन्साळी यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकांनंतर मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीसाठी डिझाइन करण्याची संधी अंजू यांना मिळाली. भन्साळी यांनी त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा बराच अभ्यास केला होता. अंजू यांची डिझाइन्स त्यांना खूप आवडली होती. समकालीन भारतीय शैलीसह अंजू मोदी यांचे आर्ट आॅफ लेअरिंगवरही प्रभुत्व आहे. त्या म्हणतात की, लेअरिंग गे्रसफुली करणे गरजेचे आहे. ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमध्ये माधुरी दीक्षितचे कपडेही अंजू मोदी यांनीच डिझाइन केले आहेत. त्यामुळे ग्लॅमर उद्योगाची नस त्यांना माहीत आहे. सृजनात्मक स्वातंत्र्य मिळाले तर चित्रपटासाठी डिझाइन करणे अवघड नाही, असेही अंजू म्हणाल्या. भन्साळी यांच्या लार्जर दॅन लाइफ कल्पना त्यांना नेहमीच आवडतात. त्यामुळे त्यांच्याशी कल्पनांचे आदानप्रदान करण्यातही काही अडचण नाही. नव्या चित्रपटाची अंजू यांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.